Maratha Reservation: गावबंदी कोणी केली ? त्यावेळी दोन समाजात वितुष्ट येते असे वाटले नाही का ? भुजबळांचा सवाल

Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ यांची जरांगे पाटलांवर जोरदार टीका
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. या अटीवरच त्यांनी आपले उपोषण स्थगित केले; पण जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलनाचे रान उठवले आहे, तर दुसरीकडे अंबडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. यानंतर जरांगे पाटलांनी भुजबळांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.

या पार्श्वभूमीवरच मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. "गेल्या दोन महिन्यांत 14 सभा झाल्या असून, प्रत्येक सभेत माझ्या विरोधात बोललं जातं. बीडमध्ये आमदारांची घरे जळली, आधी आमचे लोकं नाही हे सांगितलं, नंतर म्हणतात त्यांच्यावरील केसेस मागे घ्या, भुजबळांचे नाव घेऊन टीकाटिप्पणी करण्यात येते. मात्र, विरोध करणे गरजेचे होते आणि तो मी केला, वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने आपले मत मांडले," असे मंत्री भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं. "जे कुणबी आहेत, त्यांच्यावर काहीच बोललो नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही," असे त्यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, "गावबंदी कोणी केली, जाळपोळ कोणी केली ? त्यावेळी दोन समाजात वितुष्ट येते असे वाटले नाही का ? दोन महिने झाले धमक्या येतात," असे म्हणत भुजबळांनी अनेक सवाल उपस्थित केले.

"मुंबईत बैठकीत सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, अशी चर्चा होईल. मंत्री म्हणून समजतं की समाजात वितुष्ट होता कामा नये; पण आम्ही टायर जाळले नाही, माझी फक्त एकच सभा झाली. मात्र, एकटा तर एकटा पण लढा सुरूच ठेवावा लागेल, ओबीसींचे काम करत राहणार," असेही भुजबळांनी या वेळी स्पष्ट केले.

Edited by Ganesh Thombare

Chhagan Bhujbal
Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांचा भुजबळांच्या आडून भाजपवर निशाणा; ‘जामिनावर असल्याची आठवण करून दिली ’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com