Maratha Reservation : कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक; छगन भुजबळांचा पुतळा जाळला!

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करत घोषणाबाजीही केली.
Chhagan Bhujbal vs Maratha
Chhagan Bhujbal vs Maratha Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात निषेध नोंदवला गेला. एवढच नाही तर कागल तालुक्यात म्हाकवेत मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal vs Maratha
Bjp vs Shinde Group : "PM मोदींच्या बदनामीचा आरोप ; भाजप नेत्याकडून थेट मुख्यमंत्री शिंदेंच टार्गेट!

म्हाकवे येथील सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्या वतीने बस स्थानक परिसरात भुजबळांच्या पुतळ्याचे दहन केले गेले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली.

सकल मराठा समाजाकडून पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मंत्री भुजबळ यांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्कालपटी करावी. तसेच त्यांच्यावर राज्य सरकारने आळा घालावा अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा मराठा समाज बांधवांनी दिला.

Chhagan Bhujbal vs Maratha
Namdevrao Jadhav Black ink Attack : होय, आम्हीच नामदेवराव जाधवांना काळं फासलं; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली जबाबदारी!

भुजबळ हे आपल्यासाठी चिल्लर - मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काल मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. रात्री उशिरा दसरा चौकातील सभा संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, त्यांनी मंत्री छगन भुजबळ हे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळ हे आपल्यासाठी चिल्लर आहेत. या शब्दात त्यांनी भुजबळ यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मराठा समाज बांधवांना दिला आहे.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com