Bhanudas Murkute News : भानुदास मुरकुटेंची 'या'साठी मंत्री विखे,थोरातांकडे आयुष्यभर पाणी भरण्याची तयारी!

Ahmednagar Political News : " ज्यांनी पाप केले तेच आता... "
Bhanudas Murkute
Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे-

Ahmednagar News : श्रीरामपूरमधील अशोक कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना थेट आव्हान दिले आहे. समन्यायी कायदा रद्द करा. तुमच्याकडे आयुष्यभर पाणी भरेल, असे भानुदास मुरकुटे म्हणाले.

भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. बीआरएसचे (BRS) तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे हे अध्यक्षस्थानी होते. गंगापूरचे माजी आमदार आण्णासाहेब माने, भाऊसाहेब कांबळे, कामगार नेते अविनाश आपटे, सचिन गुजर, मंजुश्री मुरकुटे, सुनिता गायकवाड उपस्थित होते. संचालक प्रफुल्ल आणि योगिता दांगट, भिकचंद आणि सौ. मीरा मुठे यांच्या हस्ते गव्हाण पूजन झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhanudas Murkute
Ajit Pawar Health Update News : अजितदादांचा ताप 100 क्रॉस, प्लेटलेट्सही 80 हजार

भानुदास मुरकुटे म्हणाले, "समन्यायी पाणी वाटपाचे विधेयक 2003 रोजी विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी, तर विधानपरिषदेत तत्कालीन राज्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले. हा कायदा 2005 मध्ये मंजूर झाला.मधले दोन वर्षे यासंदर्भात तत्कालीन आमदारांनी कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे हे सर्वजण समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाचे धनी आहेत". ज्यांनी पाप केले तेच आता हा कायदा रद्द करण्याची मागणी करत असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

आपण आमदार असतो तर हा कायदा होऊ दिला नसता. या कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडीसाठी भंडारदरा, निळवंडेतून 3.6 टीएमसी पाणी सोडणार आहेत.भविष्यातील धोका लक्षात घेवून आपण आमदार असताना बिनकालव्याचे निळवंडे होण्याची मागणी केली होती. ती मान्य झाली असती तर आजचे संकट उद्भवले नसते, असेही भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) म्हणाले.

निळंवडेच्या पाण्यासाठी ठराव

आपल्या भागासाठी भंडारदर्‍याचे केवळ नऊ टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे गोदावरी व प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान व मुठेवाडगाव टेलटँक तसेच ओढ्या-नाल्यावरील बंधारे, पाझर तलाव यासाठी निळवंडे धरणातील 2 टीएमसी पाणी आरक्षित करावे आणि असा ठराव गावोगावच्या लोकांनी करावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी यावेळी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Bhanudas Murkute
Maratha Reservation News : मराठा, धनगर आरक्षणासाठी बाबासाहेब देशमुख मैदानात ; मुंडन करत पाठिंबा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com