Maratha Reservation Politics : सकल मराठा समाजाचा उमेदवार कोणाच्या पथ्यावर?

Maratha community will give candidate in Nashik : मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते नाशिकमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. हा उमेदवार कोणाला फायदेशीर ठरतो आणि कोणाचे नुकसान करतो, हा उत्सुकतेचा विषय असणार आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Nasik Loksabha 2024: नाशिक मतदारसंघात जागावाटपावरून सत्ताधारी पक्षांत मोठा वाद आहे. त्यातच आता एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघामध्ये आता सकल मराठा समाजानेही उडी घेतली आहे. सुरुवातीला मतदारसंघात पाचशे उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्याचा फेरविचार करण्यात आला आहे. 500 उमेदवार देण्याऐवजी सत्ताधारी उमेदवाराला धक्का देण्यासाठी एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा उमेदवार कोणाला फायदेशीर ठरतो आणि कोणाचे नुकसान करतो, हा उत्सुकतेचा विषय असणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक येथे होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा होईल. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार ही बैठक होत आहे. या बैठकीत सत्ताधारी पक्षाला धक्का देण्यासाठी मराठा समाजाचा एक उमेदवार निवडणुकीत उतरविण्याच्या सूचना जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत. त्यावर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत आजमावण्यात येणार आहे. त्यानंतरच उमेदवार द्यायचे किंवा अन्य पर्याय निवडायचे याचा विचार होणार असल्याचे समन्वयक नाना बच्छाव यांनी सांगितले.

हेदेखील वाचा -

Manoj Jarange
Lok Sabha 2024 : मतदारांचा कल जाणण्यासाठी भाजपची रुग्णालयापर्यंत उडी!

नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) महायुतीने शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीवरून ठाकरे गटाचे विजय करंजकर नाराज आहेत. विरोधात महायुतीकडून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत असेल.

नाशिकमधून शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) आणि त्र्यंबकेश्वर येथील सिद्धेश्वर महाराज (Siddheshwar Maharaj) यांनीही अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजपकडून निराशा झालेले दिनकर पाटील हेदेखील उमेदवारीची घाेषणा करण्याची शक्यता आहे. बहुजन समाजाच्या उमेदवारांच्या या भाऊ गर्दीत मराठा समाजाने आणखी एक उमेदवार दिल्यास निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारापेक्षा विरोधकांनाच या उमेदवाराची झळ बसू शकते.

Edited By: Rashmi Mane

हे देखिल वाचा -

R

Manoj Jarange
Ajit Pawar Vs Vijay Shivtare : विजय शिवतारे - अजित पवारांचं वैर मिटलं; रात्रीच्या भेटीत काय ठरलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com