Shantigiri Maharaj News: प्रचारात संत जनार्दन स्वामींचा फोटो? शांतीगिरी महाराजांना विरोध

Nasik Loksabha 2024: संत जनार्दन स्वामी यांच्या दोन शिष्यांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात सध्या यांची चर्चा सुरू आहे.
Shantigiri Maharaj
Shantigiri MaharajSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक मतदारसंघातून निवडणूक (Nasik Loksabha 2024) लढविण्याचा शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी निर्णय घेतला आहे. मात्र, निवडणुकीआधीच शांतीगिरी महाराजांच्या प्रचारावरून नवा वाद सुरू झाला आहे. शांतीगिरी महाराज यांना राजकीय पक्षांनी जवळ न केल्याने ते अपक्ष म्हणून लढणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची तयारी केलेल्या शांतीगिरी महाराज यांना निवडणुकीआधीच विरोधकांनी नव्हे तर त्यांच्याच पंथातील समर्थकांनी विरोध सुरू केला आहे. यानिमित्ताने संत जनार्दन स्वामी यांच्या दोन शिष्यांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. सध्या नाशिक मतदारसंघात याचीच चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वेश्वर महादेव ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्त मंडळांनी शांतीगिरी महाराज यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शांतीगिरी महाराजांनी आपल्या निवडणूक प्रचारात संत जनार्दन स्वामी यांचे छायाचित्र वापरू नये, अशी भूमिका घेतली आहे. जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो प्रचारात वापरल्यास कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही त्यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रचारामध्ये संत जनार्दन स्वामी यांचा फोटो वापरला नव्हता, असा दावा या ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश सूर्यवंशी, मधुकर जेजुरकर व अन्य विश्वस्तांनी केला आहे.

Shantigiri Maharaj
Shirdi Lok Sabha 2024: MNS च्या एन्ट्रीने शिर्डीत 'शिवसेने'सह 'रिपाइं'ची डोकेदुखी

सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या विश्वस्तांनी शांतीगिरी महाराज यांच्याबाबत विरोधाची भूमिका घेतली. त्याला शांतीगिरी महाराजांच्या अनुयायांनीदेखील उत्तर दिले आहे. शांतीगिरी महाराजांचे शिष्य विष्णू महाराज यांनी याबाबत उत्तर दिले आहे.

ते म्हणाले,"संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतीगिरी महाराज आहेत. त्यावर कोणीही हरकत घेऊ शकत नाही. आताही मंडळी जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचा वापर निवडणुकीत करू नये, अशी मागणी करीत आहेत. मात्र, त्यांना तसा अधिकार नाही. ते शांतीगिरी महाराजांच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठे षडयंत्र रचले आहे. मात्र, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही,"

शांतीगिरी महाराज यांनी प्रारंभिक भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्याचादेखील शांतीगिरी महाराज यांनी प्रयत्न केला होता. राजकीय पक्षांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आता ते अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी जाहीर केले आहे. श्री शांतीगिरी महाराज यांनी 2009 मध्येदेखील लोकसभा निवडणूक लढवली होती. यंदा मात्र त्यांची उमेदवारी निवडणुकीआधीच वादामुळे चर्चेत आली आहे. आता त्यांना राजकीय पक्षांचे विरोधक नव्हे तर संत जनार्दन स्वामी यांच्या ट्रस्टच्या विरोधकांनी लक्ष्य केले आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Shantigiri Maharaj
Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com