Tribal Long March: गिरीश महाजन यांची मध्यस्थी यशस्वी; आदिवासींचे लाल वादळ मुंबईत शिरण्याआधीच माघारी फिरले!

Tribal Long March called off after meeting with Girish Mahajan: आदिवासींच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे लिखित आश्वासनामुळे लॉंग मार्च स्थगित
Girish Mahajan &  J. P. Gavit
Girish Mahajan & J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

Adivasi Protest Mumbai: वनजमिनींचे पट्टे मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी आदिवासी लॉंग मार्च निघाला होता. हे लाल वादळ मुंबईत शिरले असते शहर विस्कळीत झाले असते. त्यामुळे यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला.

किसान सभेतर्फे जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचा लॉंग मार्च मुंबईकडे निघाला होता. पन्नास हजार आदिवासी शेतकरी त्यात सहभागी झाले होते. काल सायंकाळी मुंबईच्या सीमेवर हा मोर्चा पोहोचला होता.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षांनी वर्ष स्थानी चर्चा झाली होती. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. या मागण्या मान्य करीत त्यावरील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Girish Mahajan &  J. P. Gavit
Jalgaon Mayor Election: महापौर पदाचा तिढा वाढला; गिरीश महाजन यांच्याकडे जोरदार लॉबिंग!

दक्षिणेकडे वाहून जाणारे पाणी वळवून आदिवासींना देण्यात यावे. पेसा कायद्याची अंमलबजावणी प्रभावी करावी. आदिवासी भरती तातडीने सुरू करावी यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Girish Mahajan &  J. P. Gavit
Ajit Pawar funeral : आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं? अजित पवारांच्या चितेसमोर नतमस्तक झाल्यानंतर सूरज चव्हाण गहिवरला..

यासंदर्भात काल सायंकाळी भातसा फाटा, ठाणे येथे अर्थात मुंबईच्या सीमेवर हा मोर्चा पोहोचला होता. मंत्री महाजन यांनी किसान सभेच्या विविध नेत्यांची चर्चा केली. शासन आणि आदिवासी नेत्यांमध्ये मध्यस्थी यशस्वी झाल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

पन्नास हजार आदिवासींचा हा मार्च मुंबईत शिरला असता तर वाहतूक विस्कळीत झाली असती. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचे जनजीवन बाधित होण्याची शक्यता होती. या संदर्भात मंत्री महाजन यांची मध्यस्थी यशस्वी झाल्याने हा मोर्चा मुंबईच्या सीमेवरून नाशिककडे परतला आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासनाच्या वतीने लिखित आश्वासन किसान सभेच्या नेत्यांना दिले. यावेळी अशोक ढवळे, डॉ अजित नवले, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख, इंद्रजीत गावित, सुनील मालुसरे, भिका राठोड यांसह विविध नेत्यांनी चर्चेत भाग घेतला. हा मार्च स्थगित करावा यासाठी मंत्री महाजन आणि शासकीय अधिकाऱ्यांनी काल दिवसभर धावपळ केली.

हा मार्च चौथ्यांदा स्थगित झाला आहे. २०१८ मध्ये वन हक्क जमिनींच्या पट्ट्यासाठी नाशिकहून लॉंग मार्च काढण्यात आला होता. यावेळी शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले. २०१९ तसेच २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधिमंडळात या मागण्यांबाबत मोर्चाला आश्वासित केले होते. मात्र त्याची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे गेल्या आठवड्यात किसान सभेने चौथ्यांदा मुंबईच्या दिशेने आदिवासींसह कुछ केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com