Ajit Pawar funeral : आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं? अजित पवारांच्या चितेसमोर नतमस्तक झाल्यानंतर सूरज चव्हाण गहिवरला..

Suraj Chavan at Ajit Pawar Funeral : सूरजला स्वत:चं घर बांधून देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला. तो शब्द खरा करत सूरजला सुंदर घर बांधून दिलं होतं. त्यांच्या चितेसमोर नतमस्तक होताना सूरज गहिवरला होता.
Suraj Chavan at Ajit Pawar Funeral
Suraj Chavan at Ajit Pawar FuneralImage Credit source: Instagram
Published on
Updated on

Ajit Pawar funeral : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कामाचा माणूस अशी ओळख असलेले धडाडीचे नेते अजित अनंतराव पवार (वय ६६) यांचा 28 जानेवारी २०२६ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. आज दि. (२९) बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी बारामतीत अफाट असा जनसागर लोटला होता. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी अजितदादांचे अंतिम दर्शन घेतले. दादांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळतोय, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या अफाट गर्दीतला एक चेहरा म्हणजे बिग बॉस मराठीचा विजेता आणि कंटेंट क्रिएटर सूरज चव्हाण होय.

अजितदादांचा निरोप घेण्यासाठी आलेला सूरज चव्हाण दादांच्या चितेसमोर नतमस्तक झाला तेव्हा तो फार गहिवरला होता. अवघ्या महाराष्ट्रासाठी अजित पवार हे दादा होते, परंतु सूरज चव्हाणसाठी ते त्याच्या आई-अप्पांसारखेच होते. आई वडिलांच्या नंतर मी तुमच्यातच माझे आई-आप्पा पहात होतो, आणि तुम्ही पण मला सोडून गेलात, आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं असं म्हणत त्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. MISS YOU DADA म्हणत त्याने आपल्या भावनांना आवर घातली.

Suraj Chavan at Ajit Pawar Funeral
लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी अफाट जनसागर लोटला, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी..

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन सूरजने अजितदादांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्याने त्यांच्या चितेसमोर डोकं टेकवून नतमस्तक झाला. आपल्या आई-आप्पांप्राणे आपल्यावर जीव लावणारा अत्यंत जवळचा व्यक्ती गमावल्याची भावना सूरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

दादांचे निधन झाले तेव्हाही सूरज चव्हाण याने फेसबुकवर भावूक पोस्ट केली होती. मित्रांनो माझा देव चोरला आज, मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाहीयेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं. माझी काळजी घेतली. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं.अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही. त्यांचे निधन झाल्याने लई वाईट वाटतय. लई दुःख होतंय. माझ्या आई आबा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन अशी पोस्ट सूरजने केली होती.

Suraj Chavan at Ajit Pawar Funeral
Ajit Pawar Death : नाशिक जिल्ह्याने दादांना सात आमदार दिले, दादा मोठ्या मनाचे.. त्यातल्या तिघांना मंत्री केले

सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाला तेव्हा दादांनी त्याचे अभिनंदन केले होते. त्याला स्वत:चं घर बांधून देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला होता. आपल्या शब्दाचे पक्के असणाऱ्या अजितदादांनी सूरजला सुंदर घर बांधून दिलं होतं. दादांच्या निधनाने सूरज पूर्णपणे खचल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com