Crime: १४ लाखांचा गांजा पिकवणाऱ्या वृध्दाची कारागृहात आत्महत्त्या

वन जमिनीवर गांजा व अंमली पदार्थाची शेती करणाऱ्या पावराने केली आत्महत्या.
Jamsingh Pawra
Jamsingh PawraSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शेतात १४ लाख किमतीचा गांजा (Marijuana farming) पिकवणाऱ्या फत्तेपूर (Dhule) शिवारातील सांज्यापाडा (ता. शिरपूर) येथील वृध्दाने धुळे शहरातील जिल्हा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. (A oldage farmer arrested by police, suicide in Jail)

Jamsingh Pawra
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांचा 'भाव' वधारला

गांजा प्रकरणी सांज्यापाडा येथील जामसिंग जसमल पावरा (वय ७०) याच्यावर पोलिस कारवाई झाली. त्याने आर्थिक फायद्यासाठी वन क्षेत्रातील शेतात गांजा या अंमली पदार्थात गणल्या जाणाऱ्या वनस्पतीची लागवड केली. तशी माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शेतात कारवाई करत १४ लाख ४६ हजार ६०० किंमतीची एकूण ४८२ किलो गांजाची झाडे जप्त केली. तसेच संशयीत जामसिंग पावरा याला अटक करण्यात आली.

Jamsingh Pawra
ईडीने काँग्रेस भोवतीचा फास आवळला; पाच नेत्यांना समन्स…

ही कारवाई २८ सप्टेंबरला झाली. त्याला ३० ला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्याची जिल्हा कारागृहात रवानगी झाली. त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक दोनमध्ये दाखल करण्यात आले. असे असताना सोमवारी (ता. ३) पहाटे तीनच्या सुमारास त्याने कारागृहातील शौचालयात खिडकीच्या लोखंडी गजाला बांधून पांढऱ्या कापडाच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्त्या केली.

काही बंदीवानांना गळफासाचा प्रकार लक्षात आल्यानंतर कारागृह प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने न्यायाधीश, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्‍वर कातकडे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना घटनेची माहिती दिली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com