`त्या` उड्डाणपुलाला विरोधामागे नेत्यांचे राजकारण की `अर्थकारण`

सर्वाधिक उड्डानपुल बांधणाऱ्या भाजपचा नाशिकच्या उड्डाणपुलाला विरोध.
Nashik Municiple corporation Building
Nashik Municiple corporation BuildingSarkarnama

नाशिक : मुंबई (Mumbai) व महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक उड्डाणपूल भाजपने (BJP) बांधले. त्याच पक्षाच्या महापौरांनी नाशिकच्या (Nashik) उड्डाणपुलाला सर्वप्रथम विरोध केला. अनेकांचा विरोध वाढत आहे. यामागे राजकारण, श्रेयवाद, `अर्थकारण` की अन्य काही याची चर्चा सध्या सुरु आहे.

Nashik Municiple corporation Building
येणाऱ्या निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू

सिडकोच्या प्रगतीचा आलेख उंच उंच ‘उड्डाण’ घेऊ पाहणाऱ्या त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉलदरम्यानच्या उड्डाणपुलाला आता दिवसेंदिवस ‘या ना त्या’ कारणाने विरोधाची धार वाढताना दिसून येत असल्याने नेमके या उड्डाणपुलाच्या विरोधामागे नेमके दडले तरी काय, असा सवाल आपसूकच सिडकोवासीयांच्या घराघरांत व मनामनांत घोंघावत असून, त्याची कारणमीमांसा होत आहे.

Nashik Municiple corporation Building
मुंबई महापालिकेतील स्वबळासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा कानमंत्र!

मुंबई व महाराष्ट्रात सर्वाधिक उड्डाणपूल भाजपने बांधले. त्याच पक्षाच्या महापौरांनी या उड्डाणपुलाला सर्वप्रथम विरोध केला. पूल करण्यापेक्षा त्या खर्चात शहरातील इतर विकासकामे करा, असा उपदेशाचा डोसही पाजण्यास ते विसरले नाहीत. विशेष म्हणजे तोपर्यंत कार्यारंभ आदेशही निघाला होता. मग त्यांना उशिराने अशा प्रकारे उपरती सुचण्याचे कारण काय? त्यानंतर विरोध झाला तो महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीतील भाजप सदस्याकडून. सिमेंटची ग्रेड एम ४० असावी की ६० असावी यावरून विरोध झाला.

तो वाद मिटत नाही, तोच त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. नेमके त्याचदरम्यान महापालिकेने हेरिटेज झाड तोडण्याची नोटीसही बजावली आणि विरोध सुरू झाला तो पर्यावरणप्रेमींचा. हेरिटेज झाड तोडता येत नाही, महापालिका प्रशासनाला माहीत नसावे का, याबाबत पर्यावरणप्रेमींनी आश्चर्यही व्यक्त केले. त्यावर मग स्वपक्षाचेच पर्यावरणमंत्र्यांनी हेरिटेज झाड न तोडता उड्डाणपुलाची दिशाच बदलण्याचा फतवा काढला आणि तेवढ्यापुरती पर्यावरणप्रेमींची वाहवा मिळविली. हा वाद शमत नाही, तोच ज्यांनी आशिया खंडातील सर्वाधिक किलोमीटरचा उड्डाणपूल नाशिक महामार्गावर उभारण्याचे श्रेय घेतले त्या पालकमंत्र्यांनीच उड्डाणपुलाच्या वादात उडी घेऊन उड्डाणपुलाची काहीएक गरज नसल्याचे सांगून थंड झालेले वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक पाहता हा विरोध बाहेरच्यांनी करण्यापेक्षा ज्या प्रभागात उड्डाणपूल होत आहे, त्या प्रभाग व विधानसभा मतदारसंघांतर्गत होत आहे त्यांनी हा विरोध करणे अपेक्षित होते. मात्र, येथे तसे न होता या प्रभागातील भाजप नगरसेविका व नाशिक पश्चिम विधानसभेच्या महिला आमदारांनी उड्डाणपुलास मात्र कुठल्या प्रकारचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण देऊन स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे, ही बाब आश्चर्याचीच म्हणावी लागेल, तर दुसरीकडे याच उड्डाणपुलाच्या पुढे होणारा दुसरा एक उड्डाणपूल याच भाजपच्या एका नगरसेवकाने मंजूर केला आहे. त्याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजपचे उड्डाणपुलाबाबतचे बेगडी प्रेम यातून स्पष्ट होते. म्हणून म्हणावेसे वाटते, अहो! या उड्डाणपुलामागे नेमके दडलेय तरी काय? यामागे काही अर्थकारण, राजकारण, श्रेयवाद की अजून काही, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि ते समजण्याइतके नागरिकही काही दूधखुळे नाहीत, हे मात्र नक्की!

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com