Nagar South Lok Sabha Constituency : निवडणुकीतून माघार घेतल्याने 'MIM'च्या उमेदवारास थेट पाकिस्तानातून मिळाली धमकी?

MIM Ahmadnagar District President : ‘तू और तेरे साथ वाले दीन गिनना चालू कर’, अशी धमकी फोनद्वारे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Nagar South Lok Sabha Constituency : निवडणुकीतून माघार घेतल्याने 'MIM'च्या उमेदवारास थेट पाकिस्तानातून मिळाली धमकी?
Sarkarnama

Loksabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदारस्थितीत पोहोचली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून एकमेकांना शह देण्याची कोणतीची संधी सोडली जात नाही. या दोघांनी ही निवडणूक कायद्याच्या चौकटीपर्यंत नेली आहे. विशेष म्हणजे देशासाठी ही निवडणूक असली, तरी या निवडणुकीवर पाकिस्तानातूही लक्ष असल्याचे समोर आले आहे.

कारण, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 'एमआयएम'च्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संबंधित उमेदवाराला पाकिस्तानातून धमकीचा व्हाट्सअप काॅल आला आहे. 'एमआयएम'चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेझ उमर शेख यांनी या धमकीप्रकरणी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मतदान 13 मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 'एमआयएम' पक्षाकडून जिल्हाध्यक्ष डॉ. परवेझ उमर शेख (वय 44, रा. फुटाणे गल्ली, गंजबाजार, नगर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 'एमआयएम'ने निवडणुकीत एन्ट्री केल्याने निवडणूक चर्चेस्थानी आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar South Lok Sabha Constituency : निवडणुकीतून माघार घेतल्याने 'MIM'च्या उमेदवारास थेट पाकिस्तानातून मिळाली धमकी?
Nilesh Lanke News: ''...त्या 'PI'ला निरोप द्या, म्हणा तुमचा बाप येतोय'' ; नीलेश लंकेंची पोलिसांना धमकी?

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होईल, असे वाटत असतानाच 'एमआयएम'च्या एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण केला. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एमआयएमचे डाॅ. परवेझ शेख यांनी उमेदवारी मागे घेतली. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माघारी घेतला, यामुळे डॉ. परवेझ शेख यांच्या भूमिकेविषयी पक्षातील स्वकीयांकडूनच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. तसेच टीका देखील होऊ लागली आहे.

डॉ. परवेझ शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून काहीसा सार्वजनिक वावर देखील कमी केला आहे. यातच त्यांना आता पाकिस्तानातून धमकीचा कॅल आल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. डॉ. परवेझ शेख मंगळवारी दुपारी त्यांच्या नगर शहरातील गंजबाजार येथील घरी असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून व्हॉट्सअप कॉल आला. यात ‘तू और तेरे साथ वाले दीन गिनना चालू कर’, अशी धमकी दिली. याप्रकरणी डॉ. परवेझ शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान हा धमकीचा फोन पाकिस्तानमधून आला असल्याचा दावा डॉ. परवेझ शेख यांनी बोलताना केला आहे.

Nagar South Lok Sabha Constituency : निवडणुकीतून माघार घेतल्याने 'MIM'च्या उमेदवारास थेट पाकिस्तानातून मिळाली धमकी?
Nilesh Lanke News: 'हो डिपार्टमेंट... डिपार्टमेंट बाजूला व्हा! नीलेश लंकेंचा इशारा

दरम्यान, निवडणुकीत 'एमआयएम' पक्षाचे उमेदवार डॉ. परवेझ शेख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल आणि माघारी घेण्यावरून एमआयएम पक्षातील नगरच्या कार्यकर्त्यांनी आरोपांची राळ उठवली आहे. डॉ. परवेझ शेख यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी पत्रक काढून केला आहे. डॉ. परवेझ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि मागे घेताना कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. 'एमआयएम'ची धुरा सांभाळणारे डॉ. परवेझ शेख यांनी अर्ध्या रात्री उमेदवारी करण्याचे ठरवले. तसेच माघार देखील घेतली. त्यांनी एकप्रकारे 'एमआयएम' पक्षाला निवडणुकीत विकण्याचा घाट घातला, असा आरोप 'एमआयएम'चे कार्याध्यक्ष मतीन शेख आणि युवक अध्यक्ष अमीर खान यांनी काढलेल्या पत्रकात केला आहे.

पक्षाकडील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आरोप करत असताना, डाॅ. परवेझ शेख सध्या तरी मौन बाळगून आहेत. यावर लवकरच पक्षातील वरिष्ठांना भेटून सविस्तर अहवाल सादर करू. यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोरच नगरमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासमोर भूमिका मांडू, असे डाॅ. परवेझ शेख यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com