Nilesh Lanke News: ''...त्या 'PI'ला निरोप द्या, म्हणा तुमचा बाप येतोय'' ; नीलेश लंकेंची पोलिसांना धमकी?

Nagar South Lok Sabha Constituency 2024: कोतवाली पोलिसांना उद्देशून माजी आमदार नीलेश लंके यांनी भर सभेत, केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Nagar Political News:  महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगर शहरातील केडगाव उपनगरात झालेल्या सभेत नीलेश लंके यांनी पुन्हा एकदा पोलिसांना अंगावर घेतले आहे.

कोतवाली पोलिसांना उद्देशून माजी आमदार नीलेश लंके(Nilesh Lanke) यांनी भर सभेत, त्या पीआयला सांगा, दहा मिनिटांत तिथे तुमचा बाप येतोय म्हणून! नीलेश लंकेंचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, त्यातून राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Nilesh Lanke News: 'हो डिपार्टमेंट... डिपार्टमेंट बाजूला व्हा! नीलेश लंकेंचा इशारा

नीलेश लंके या व्हिडिओत म्हणाले, 'केंद्र सरकार केंद्रीय एजन्सीचा वापर करून सत्तेत आहे. सरकारमध्ये बदल घडत आहेत, ते ईडी आणि सीबीआयमुळे. विरोधात बोलला की त्यांना जेलमध्ये टाकले जाते. गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला की झाला साधूसंत. ही कोणती पद्धत?' असा सवाल केला.

तसेच, केंद्रात हे चालू असताना राज्यात देखील हेच चालू आहे. नगर जिल्ह्यात पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेचा वापर केला जात आहे, असे सांगून नगरमधील एका हॉटेलवर मीडियाची मंडळी राहत होती, त्यांच्याबरोबर काही वकील होते, त्यांच्याकडे 50 ते 60 हजार रुपये सापडले. आता कोणाकडेही असतात मात्र लगेचच पोलिसांनी त्यांना सहा वाजल्यापासून ताब्यात घेतले.

'इथं डिपार्टमेंटचं कोणी असले, तर त्या 'पीआय'ला (पोलीस निरीक्षक) निरोप द्या. म्हणा तुमचा बाप येतोय दहा मिनिटांत तिथे. चुकीच्या पद्धतीने यंत्रणेचा वापर केला जातोय. एखादा शिक्षक आपल्याबाजूने बोलला की त्याला निलंबित केलं जात आह', असे म्हणताना दिसत आहे.

Nilesh Lanke
Nashik Loksabha Constituency : भाजपने नाशिक मतदारसंघावरील दावा सोडला; शिवसेनेचा जीव भांड्यात!

नीलेश लंके यांचा गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमकपणा वाढला आहे. शेवगाव—पाथर्डी येथे झालेल्या सभेत देखील त्यांनी सभेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना फटकारले होते. सभेत आलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस काही सूचना करत होते. त्यावेळी नीलेश लंके यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी नीलेश लंके यांनी डिपार्टमेंट बाजूला व्हा. कार्यकर्त्यांना पुढे येऊ द्या, आमच्या लोकांना पाहू द्या.

आम्ही आमच्या लोकांना संरक्षण देण्यास समर्थ आहोत. निवडून लागल्यापासून तुम्ही पोलीस प्रशासनाने किती त्रास दिला, याची आमच्याकडे सगळी नोंद आहे. सगळा हिशोब करू 13 तारखेनंतर बघून घेऊ. अशा इशारा दिला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com