Imtiyaz Jaleel News : महायुती, महाविकास आघाडीचं ठरेना; 'एमआयएम'ने मारली बाजी

AIMIM News : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच महायुती आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Imtiyaz Jaleel
Imtiyaz JaleelSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Political News : राज्यातील महायुती-महाविकास आघाडीच्या याद्या रखडल्या आहेत. भाजपने राज्यातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली. तर एमआयएमने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातून पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा करत बाजी मारली. संभाजीनगरची जागा महायुतीतील शिवसेना-भाजप पैकी कोण लढवणार? यावर गेल्या काही महिन्यापासून खल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा होण्यापूर्वी हा तिढा सुटेल, असे वाटत होते. परंतु अद्यापही यावर राज्य आणि दिल्लीतील नेत्यानाही तोडगा काढता आलेला नाही. उमेदवार जाहीर न करता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट अजूनही तटस्थ आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. यावेळी इंडिया आघाडीची एकजूट दिसली.

Imtiyaz Jaleel
Mangal Prabhat Lodha : जरीमारी परिसर दहशतमुक्त! मंगलप्रभात लोढांचा कट्टरपंथिय गुंडाला दणका

राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) या सभेला हजेरी लावली. असे सगळे छान सुरू असले तरी महाविकास आघाडीचे जागा वाटप मात्र अजूनही अंतिम होताना दिसत नाही. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हिंगोलीत येत्या 72 तासांत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले जातील, असे स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी शिवसेनेच्या दहा उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचा चर्चा दिवसभर सुरू होत्या. ती यादीही अजून फाईलमधून बाहेर आलेली नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.

महायुती - महाविकास आघाडीमध्ये हा घोळ सुरू असतांना आतापर्यंत वेट अॅन्ड वाॅचच्या भूमिकेत असलेल्या एमआयएमने मात्र इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नावाची घोषणा करून टाकली. एमआयएमला विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी एका मित्र पक्षाची गरज आहे, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. तरीही महायुती-महाविकास आघाडी यांच्यातील थेट लढत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मतांचे विभाजन होण्याची शक्यता, या आशेवर एमआयएमने पुन्हा मैदानात उडी घेतली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Imtiyaz Jaleel
Omraje Nimbalkar : लोकांचे फोन उचलण्याशिवाय ओमराजेंनी काय काम केलं? अजित पवार गटाचे कळीच्या मुद्द्यावर बोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com