Gram Panchayat Election Results : अमळनेरमध्ये मंत्री अनिल पाटलांची बाजी, चौदापैकी सहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

Anil Bhaidas Patil News : अमळनेर तालुका एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु...
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Amalner News : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. चुरशीच्या ठरलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे अर्ध्याहून अधिक निकाल जाहीर झाले असून, त्यात महायुतीने वर्चस्व मिळविल्याचे समोर येत आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात होते. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला फोडल्यानंतर मतदार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.परंतु, ग्रामपंचायतीच्या निकालात मात्र भलतंच चित्र समोर आले आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election : आमदार आबिटकरांना घरच्या मैदानावर भाजपने गाठले ; सदस्य आले पण सरपंचपदाचा उमेदवार पडला

ग्रामपंचायत निवडणुकीस (Gram Panchayat Election) अमळनेर तालुक्यात अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जोरदार बाजी मारली आहे. चौदापैकी सहा ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. तालुक्यात भाजपला दोन, तर इतर सर्व गटाला एकेक जागा मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमळनेर तालुका एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवार यांचे 'घड्याळ' हातात बांधले आणि त्यांना त्याचा फायदा झाला. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा सामवेश होऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्रिपद त्यांना मिळाले.

तसेच शेजारच्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीही पदही मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अजित पवार गटाचा झेेडा फडकविला आहे. चौदा ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतींवर यश मिळविले आहे. भाजपला एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला एक, शिवसेना शिंदे गटाला एक, शिवसेना ठाकरे गटाला एक, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या आघाडीला एक जागा मिळाली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) गटाचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार :

असे- मुडी-मंदाबाई भाऊराव पाटील, लोंढवे- भारती अशोक पाटील, सडावण राजोरे-भैयासाहेब वाल्मीक पाटील, शिरसाळे बुद्रुक- माधुरी सूर्यवंशी, मठगव्हाण -तारकेश्‍वर गांगुर्डे, गोवर्धन बोरगाव- पंकज युवराज निकम,

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : मावळचा सरदार कोण? निवडणूक निकालावरून भाजप आणि अजित पवार गटात जुंपली!

इतर गटाचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार :

गिरीश सोनजी पाटील (शरद पवार गट), सडावण-राजकुमार पाटील (भाजप), मंगरूळ- समाधान पारधी (शिवसेना उबाठा), नंदगाव-दामोदर पाटील (शिरीष चौधरी आघाडी) भरवस- हिरा दयाराम भिल (अपक्ष), ढेकूसिम- सुरेखा प्रवीण पाटील (शिवसेना शिंदे गट)

(Edited By Deepak Kulkarni)

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : संगमनेर ग्रामपंचायत निवडणुकीत 'बाळासाहेब थोरात, लय जोरात...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com