Rane Vs Thackeray : उद्धव ठाकरेंचे हात आता छोटे झालेत; नारायण राणे यांचा 'मार्मिक' टोला

Shirdi BJP Convention : भाजपचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या घोषणेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Uddhav Thackeray-Narayan Rane
Uddhav Thackeray-Narayan Rane Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi, 12 January : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे माजी मंत्री, खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली. "बाळासाहेबांनी जे 46 वर्षांत कमावलं होतं, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावलं. पूर्वी उद्धव ठाकरे हे हात वर करून बोलायचे, आता त्यांचे हात छोटे झाले आहेत", अशी टीका नारायण राणे यांनी केली.

शिर्डी येथील भाजपच्या महाविजयी अधिवेशनात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकतेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT) आणि भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, "वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतात. तो निर्णय आम्हाला मान्य राहील".

Uddhav Thackeray-Narayan Rane
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंमुळे पालकमंत्रिपदाचे वाटप रखडले का? शिंदे गटातील नेत्याने दिली 'ही' माहिती

"उद्धव ठाकरे पूर्वी हे दोन्ही हात वर करून बोलायचे, मात्र आता त्यांचे हात छोटे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या केलेल्या घोषणेत ताकद दिसत नाही. आता स्वबळावर लढून काय होणार आहे? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. बाळासाहेबांनी 46 वर्षांत जे मिळवलं होतं, ते अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी गमावलं’, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

Uddhav Thackeray-Narayan Rane
Devendra Fadnavis : शिर्डीच्या अधिवेशनात फडणवीसांनी लोकसभेची ‘ती’ खंत बोलून दाखवलीच; म्हणाले, ‘मनातून नापास झालो होतो’

महायुतीमध्ये शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे. यावेळी भाजपचे आमदार जास्त निवडून आलेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री आहे. शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही, ते सुद्धा एक राजकारणी आहेत, असे सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com