Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

Pratap Sarnaik Criticizes Thackeray Father Son Meeting with CM Devendra Fadnavis in Dharashiv : उद्धव ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीवर शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Pratap Sarnaik Dharashiv criticism : भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी अलीकडच्या काळात वाढल्यात. पावसाळी अधिवेशन काळात या भेट वाढलेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात तुम्ही इकडे पाहिजे होतात, असे सांगून अप्रत्यक्षपणे आॅफर देऊन टाकली.

मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची देखील मुंबईतील एका हाॅटेलमध्ये भेट झाली. फडणवीस यांच्याबरोबर ठाकरे पिता-पुत्रांच्या वाढलेल्या भेटी आता महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खटकायला लागल्या आहेत. शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भेटींवर ठाकरे पिता-पुत्रांना खोचक असं सुनावलं आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले, "ठाकरे पिता-पुत्रांच्या या भेटी गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात वैर नसते. निवडणूक काळात आम्ही एकमेकांवर तुटून पडतो. आता निवडणुका संपल्या आहेत. राज्यात महायुती सरकार आले आहे". 237 आमदार असलेल्या महायुतीचे अतिशय भक्कम असे सरकार आहे. आम्हाला कुणाची गरज नाही. खऱ्या अर्थाने महायुतीला (Mahayuti) गरज होती, तेव्हा त्यांनी पळ काढला. आता काही कामांच्या बाबतीत मुख्यमंत्री... मुख्यमंत्री.., करत आहेत, असा टोला सरनाईक यांनी लगावला.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना आहे की, संधीसाधू कोण आहेत. संधीचं सोनं करायचं प्रयत्न काही लोकं करत असतात. त्यामुळे कोणाला कधी संधी द्यायची, याची पूर्ण कल्पना मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महायुतीत काम करताना, महायुतीत आमच्या 80 जागा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 50च्यावर आमदार आहेत. हे सरकार अतिशय चांगले असून, त्यामुळे कुणी कुठेही भेटलं, हाॅटेलमध्ये भेटलं, रस्त्यावर भेटलं किंवा विधानभवनात भेटलं तरी कुणाची गरज नाही', असेही सरनाईक यांनी म्हटले.

Pratap Sarnaik
Ganesh Naik Navi Mumbai election : मंत्री नाईक नवी मुंबईत महायुतीला बाजूला सारणार? शिंदेंची शिवसेना 'टार्गेट'वर!

शिवसेने मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री योगेश कदम, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय गायकवाड यांच्यामुळे शिवसेनेचा कारभार वादात आहे. महायुतीमध्ये अस्वस्थता आहे, यावर मंत्री सरनाईक यांनी शिवसेनेतील अशा सर्वच पदाधिकाऱ्यांना फटकारल्याचं सांगितलं.

Pratap Sarnaik
Mangalprabhat Lodha : 100 कोटींच्या गैरव्यवहाराच्या फायली दाबल्या; 2021मध्ये प्रदीर्घ चर्चा, जुन्या प्रकरणावर मंत्री लोढांची मोठी घोषणा

काही गोष्टी असतात, कुठलाही पक्षाचा कोणताही आमदार वादात सापडला, तर ते सांगून आलेलं नसतं, पक्षाच्या मुख्य नेतृत्वाने वादग्रस्त आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, या विषयावर सारखं-सारखं बोलायला लावू नका. पक्षाच्या दृष्टीने सुरू असलेले कामकाज अयोग्य आहे. चुकीचं कारभाराचा परिणाम पक्षाला भोगावा लागतो. भविष्यात अशा चुका होणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबी पक्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com