Narhari Zirwal : पक्षहित की स्वार्थ! नरहरी झिरवाळ संभ्रम का वाढवताहेत

Narhari Zirwal Politics : मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. त्यांच्या मतदारसंघातील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने गोंधळ असतो हा गोंधळ वाढेल असे विधान त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांबाबत एक विधान केले. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांची राजकीय भूमिका सातत्याने चर्चेत असते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षात आहेत.

मात्र त्याचवेळी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी देखील सातत्याने आदरभाव व्यक्त करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने गोंधळ असतो हा गोंधळ वाढेल असे विधान त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

Narhari Zirwal
Santosh Deshmukh Case : सीबीआयपाठोपाठ आता एसआयटीही ॲक्शन मोडवर; स्थापना होताच घेतला असा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकत्र यावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. असे विधान आणि भूमिका त्यांनी गेले काही दिवस सातत्याने घेतले आहे. आता ते शरद पवार यांना भेटून त्यांच्यापुढे लोटांगण घालणार असे म्हणाले आहेत.

त्यांची ही भूमिका दिंडोरी मतदारसंघात सातत्याने गोंधळ निर्माण होईल अशीच राहिली आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे मतदारसंघावरील विविध संस्थांवर वर्चस्व आहे श्री शेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू सहकारी आहेत.

Narhari Zirwal
Walmik Karad : "वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो" वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "काल विश्वसनीय अधिकाऱ्याने..."

त्यामुळे मतदार संघात शेटे यांच्या सहकार्याशिवाय कोणाचे पानही हालत नाही. त्याला मंत्री झिरवाळ यांचा तरी अपवाद कसा असेल. या अडचणीमुळेच मंत्री झिरवाळ सातत्याने माझी छाती फोडली तरी शरद पवार हेच दिसतील असे सांगत असतात, असे बोलले जाते.

आपल्या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलेले विधान हे दोन्ही पक्ष किंवा नेते एकत्र यावेत यासाठी कितपत प्रभावी ठरेल याचे उत्तर क्लिष्ट आहे. मात्र असे प्रयत्न करणे यांच्या मतदारसंघातील प्रभाव आणि व्यक्तिगत राजकारणासाठी निश्चितच फायद्याचे आहे. त्यामुळेच तर जिरवाळ सातत्याने मग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे असे प्रयत्न तर करत नसावेत ना अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com