Radhakrishna Vikhe And Monika Rajale : आमदार राजळे यांची तक्रार; मंत्री विखेंच्या आदेशानंतर 'हा' विभाग रडारवर

Minister Radhakrishna Vikhe took note of Monika Rajale complaint : अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आमदार मोनिका राजळे यांनी विकास कामे निकृष्ट होत असल्याची तक्रार केली. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावर संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागप्रमुखांवर कारवाईचा आदेश दिला आहे.
Radhakrishna Vikhe And Monika Rajale
Radhakrishna Vikhe And Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्य सरकारच्या बदनामीला ठेकेदारांचे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी करताच, अशा ठेकेदारांवर कारवाईचा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला दिले.

निकृष्ट दर्जाचे कामे झाल्यास संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागातील त्या कामाशी निगडीत असलेला विभागप्रमुखाला जबाबदार धरून कारवाई करा, असा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला. मंत्री विखे यांच्या या आदेशामुळे बांधकाम विभाग रडारवर आला आहे.

अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन झाली. या बैठकीत भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांनी विकास कामांतील निकृष्टपणावर बोट ठेवले. राज्य सरकारने कोट्यवधीची कामे मंजूर केली आहेत. कोट्यवधीचा हा निधी निकृष्ट कामामुळे वाया जातो. विशेष करून रस्ते टिकतच नाहीत. ठेकेदार कशापद्धतीने काम करतात, हेच कळत नाही. सरकार प्रामाणिकपणे निधी देते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सरकारची बदनामी होते. विरोधक देखील सरकारवर तुटून पडतात. त्यामुळे विकास कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी आमदार राजळे यांनी लावून धरली.

Radhakrishna Vikhe And Monika Rajale
Bhausaheb Wakchaure : खासदार वाकचौरे यांच्या महसूल बैठकीत शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं...

पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आमदार राजळे यांच्या तक्रारीची लगेचच दखल घेतली. मंत्री विखे यांनी आमदार राजळे यांनी केलेली तक्रार रास्त असल्याचे सांगितले. जिल्ह्यात विकास कामे करताना त्याचा दर्जा राखण्याची जबाबदारी ही ठेकेदाराबरोबर संबंधित कामाशी निगडीत असलेले उपअभियंता आणि विभागप्रमुखांची आहे. निकृष्ट कामाची तक्रार आल्यास संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची तपासणी करा. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करताना बांधकाम विभागाच्या प्रमुखावर देखील कारवाई करा, असा आदेश मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

Radhakrishna Vikhe And Monika Rajale
Nilesh Lanke : नीलेश लंके सरकारची डोकेदुखी वाढवणार; जयंत पाटील, सुप्रिया सुळे नगरला आंदोलनासाठी येणार

अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर देखील देखील मंत्री विखे यांनी कार्यवाहीच्या सूचना प्रशासनाला दिल्या. विधानसभा निवडणुका पुढील तीन महिन्यानंतर आहेत. इच्छुक आमदारांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानाची तयारी केली आहे. कोठेही कसली कसर राहू नये म्हणून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध मागण्या केल्या आहेत. आपपाल्या मतदारसंघातील विविध विकास कामांकडे लक्ष वेधले आहे. यातच विकास कामांच्या निकृष्टपणाचे खापर ठेकेदारांवर फोडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com