Radhakrishna Vikhe On Mallikarjun Kharge: मंत्री विखेंनी उडवली मल्लिकार्जुन खर्गेंची खिल्ली; म्हणाले,'मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है'!

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभेला विरोधक समोरे जाताना नकारात्मक मुद्दे घेऊन गेली. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार आहेत. त्याचा उत्साह देशातच नाही, तर जगातील जनतेमध्ये बघायला मिळतो आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.
Mallikarjun Kharge- Radhakrishna Vikhe
Mallikarjun Kharge- Radhakrishna Vikhe Sarkarnama

Minister Radhakrishna Vikhe : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशात महाविकास आघाडी इंडियाचे सरकार स्थापन होणार असल्याच्या वक्तव्याची भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी खिल्ली उडवली आहे. 'मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है', असे म्हणत मंत्री विखे यांनी खर्गे यांची खिल्ली उडली.

भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देशात महायुतीचे सरकार येणार असून, विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनता 400 पारची मोहोर उमटवेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी महाविकास आघाडी इंडिया देशात 295 जागांवर निवडून येत, सत्ता स्थापन करेल, असा दावा केला होता. त्यावर मंत्री विखे यांनी एका वाक्यात उत्तर देत खिल्ली उडवली. 'मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है, देखने दो', असे म्हणत मंत्री विखे यांनी खिल्ली उडवली.

लोकसभा निवडणुकांना (Lok Sabha ) समोरे जाताना विरोधकांनी नकारात्मक मुद्दे घेऊन जनतेसमोर गेले. संविधानाला धोका आहे. लोकशाहीला धोका आहे. काँग्रेससह उद्धव ठाकरे यांनी, असे मुद्दे जनतेत सेट करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्याच नेतृत्वाला धोका होता. यातून त्यांनी नकारात्मक मुद्दे पुढे केले. परंतु जनतेने त्यांना निवडणुकीत योग्य उत्तर दिलेले दिसेल. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार आहेत. त्याचा उत्साह देशातच नाही, तर जगातील जनतेमध्ये बघायला मिळतो आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

Mallikarjun Kharge- Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : मंत्री विखेंचा लंकेंवर कडक प्रहार; 'भाडोत्री लोकांवर उभा केलाय धंदा, वाईट वाटणारच...'

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व काय असेल, यावर देखील मंत्री विखे यांनी भाष्य केले. 'हे समजण्यासाठी चार जून होऊ द्या. 4 जूननंतर अनेक लोकांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे', असे म्हणत मंत्री विखे यांनी विरोधकांना चिमटा काढला.

(Edited by : Chaitanya Machale)

Mallikarjun Kharge- Radhakrishna Vikhe
Bhanudas Murkute On Radhakrishna Vikhe : भानुदास मुरकुटे संतापून म्हणाले, 'मंत्री विखेंचा कारभार 'मोहम्मद तुघलकी' तर, आमदार कानडे 'बेजबाबदार'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com