Uday Samant : मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नाकारले, काय आहे कारण?

Uday Samant Sanjay Raut Ahmedabad Plane Crash : उदय सामंत यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता समाचार घेतला. कोणत्याही प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
Minister Uday Samant Nashik tour
Minister Uday Samant Nashik toursarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News : सांस्कृतिक कार्य आणि उद्योग मंत्री उदय सामंत शुक्रवारी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उद्योग, आयटी पार्क, साहित्य संमेलन यांसह अनेक विषयांवर माहिती दिली. मात्र त्यांचा हा दौरा विरोधकांवरील राजकीय टीकेने चांगलाच चर्चेत आला आहे.

अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाचा अपघात आणि त्यातील 265 मृत्यू हा जगभरातील चर्चेचा आणि हळहळ व्यक्त करणारा विषय आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गुजरात मध्ये दोन दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे. मात्र देशभरात आणि समाज माध्यमांवर या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत यांनी नाशिकला आल्यावर अधिकाऱ्यांच्या पारंपरिक स्वागत त्याला नकार दिला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची तयारी केली होती. मात्र सामंत यांनी अहमदाबादच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ परत न्यावे लागले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदाबाद दुर्घटनेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारवर त्यांनी टीका देखील केली. या अपघाताबाबत नेमके कारण आणि त्याची मीमांसा झाली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. या अपघाताच्या चौकशीची मागणी ही त्यांनी केली होती.

या संदर्भात उदय सामंत यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता समाचार घेतला. कोणत्याही प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. काही घटना अशा असतात की त्यावर सगळ्यांनीच काही मर्यादा पाळाव्या लागतात. सत्तेत असोवा विरोधात प्रत्येकाने हे भान पाळणे आवश्यक आहे, असे सामंत म्हणाले.

Minister Uday Samant Nashik tour
Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्र डागली; लष्करीतळ टार्गेट

...तर परिणाम चांगले होणार नाहीत

अशा घटनेची एखादी व्यक्ती राजकारण करते हे केवळ दुर्दैवी आहे. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर त्यात निधन झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. त्याचे राजकीय परिणाम देखील चांगले होणार नाहीत, असा सूचक इशारा सामंत यांनी राऊत यांना दिला.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी

विरोधकांकडून ज्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी असे वर्तन देखील योग्य नाही. याबाबत प्रत्येकाने काही संकेत पाळले पाहिजेत. अन्यथा त्यातून महाराष्ट्रातील राजकारणाचा वेगळाच संदेश जाण्याचा धोका आहे. कोणालाही ते आवडणार नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, असे सामंत म्हणाले.

Minister Uday Samant Nashik tour
BJP Workers Join NCP - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या गृह जिल्ह्यात भाजपला धक्का; कार्यकर्ते पवारांच्या राष्ट्रवादीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com