Radhakrishna Vikhe : 'निळवंडे'च्या पाण्यावरून मंत्री विखेंनी लगावला बाळासाहेब थोरातांना टोला, म्हणाले...

Nilwande Dam : लोहारे येथे विखे पाटील यांच्‍या हस्‍ते जलपुजन करण्‍यात आले
Nilwande Dam Jalpujan
Nilwande Dam JalpujanSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी कालव्‍यांच्‍या माध्‍यमातून गावात आले, हीच खरी आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्‍याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्‍यासाठी राज्‍यात आपले सरकार सत्‍तेवर यावे लागले.

शेवटच्‍या गावाला पाणी मिळेल असे नियोजन करण्‍यात आले असून, एकही शेतकरी पाण्‍यापासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilwande Dam Jalpujan
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगात उद्यापासून नियमित सुनावणी!

लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते निळवंडे पाण्‍याचे जलपुजन करण्‍यात आले. याप्रसंगी त्‍यांनी लोहारे ग्रामस्‍थांशी संवाद साधला. ग्रामस्‍थांच्‍या वतीने मंत्री विखे पाटील यांचे स्‍वागतही जल्‍लोषात करण्‍यात आले.

लोहारे ग्रामस्‍थांसह भाजपाचे तालुका अध्‍यक्ष वैभव लांडगे, शरद गोर्डे, हरिष चकोर यांच्‍यासह विविध गावांचे सरपंच आणि सदस्‍य मोठ्या सख्‍येने उपस्थित होते. प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोहारे गावचे ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, निळवंडे धरणाच्‍या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले हेच आपल्‍या दृष्‍टीने मोठे भाग्य ठरले आहे. पंतप्रधान आल्‍याने धरणाच्‍या भविष्‍यातील कामासाठी कोणत्‍याही निधीची कमतरता पडणार नाही.

डाव्‍या कालव्‍याप्रमाणेच उजव्‍या कालव्‍यातही लवकरच पाणी सोडण्‍याचे नियोजन आहे. अकोले तालुक्‍यातील उच्‍चस्‍तरीय कालव्‍यांचे कामही पूर्ण झाले असून, या कालव्‍यातूनही पाणी देण्‍याचे नियोजनही विभागाने केले आहे.

Nilwande Dam Jalpujan
Hingoli Political News : कळमनुरीत संतोष टारफे ठरू शकतात जायंट किलर.. पण

अनेक वर्षे सर्वच गावांना पाण्‍याची प्रतिक्षा होती. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर या कामाला गती मिळाली. त्‍यामुळेच कालव्‍यांव्‍दारे पाणी येऊ शकले, ही ख-याअर्थाने आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे.

आवर्तनाचा कालावधी वाढविल्‍यामुळे शेवटच्‍या गावाला पाणी देण्‍याचे नियोजन असून, जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांनीही रात्रंदिवस घेतलेल्‍या मेहनतीमुळे पाणी पोहोतच असल्‍याचे समाधान विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

Nilwande Dam Jalpujan
Shinde vs Thackeray : शिंदेंच्या संतोष बांगरांविरोधात ठाकरेंचे संतोष टारफे रिंगणात?

निळवंडे धरण अकोले तालुक्यात असले तरी या धरणातील 8 टीएमसी पाण्यावर संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यातील अनेक गावांना उजव्या-डाव्या कालव्यातून जलसिंचन होणार आहे.

डावा कालवा कार्यान्वित झालेला असून उजवा कालवा लवकरच कार्यान्वित होणार आहे. या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावरून सध्या मोठा श्रेयवाद सुरू असून यातून 2024 निवडणुकांचे मतांचे सिंचन थोरात-विखे यांच्यात सुरू आहे.

याचाच प्रत्येय सध्या येत असून विखे-थोरात ही राज्यातील दिग्गज असलेली राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र या राजकीय स्पर्धेत शेतकऱ्याच्या बांधावर पाणी येण्यास सुरुवात झालीय हे नाकारून चालणार नाही.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com