Hingoli Political News : कळमनुरीत संतोष टारफे ठरू शकतात जायंट किलर.. पण

Shivsena News : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे आदिवासी नेते डॉ. संतोष टारफे यांनी विजय मिळवला.
Hingoli Political News
Hingoli Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कळमनुरी येथील कार्यक्रमात माजी आमदार संतोष टारफे हे विधानसभेचे उमेदवार असतील असे जाहीर केले आणि एकच चर्चा सुरू झाली. (Hingoli Political News) शिवसेनेत बंड झाल्यानंतर ऐनवेळी शिंदेच्या तंबूत उडी मारणारे कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने संतोष टारफे यांची निवड केली आहे.

Hingoli Political News
Ashok Chavan News: प्रियंका गांधीच्या हेलिकाॅप्टरमध्ये अशोक चव्हाणांना `लिफ्ट`..

सुषमा अंधारे यांना उमेदवार जाहीर करण्याचे कुठलेही अधिकार नसले तरी त्यांन जाहीर कार्यक्रमातून टारफे यांचे नाव घेतल्यामुळे वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. कळमनुरीत संतोष टारफे यांना उमेदवारी मिळाली तर ते जायंट किलर ठरू शकतात, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. (Shivsena) शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये फुट पडली आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांची महायुती तर कॉंग्रेस शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांची महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत समोरासमोर असणार आहे. (Hingoli) त्यामुळे जागावाटप ही सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी असणार आहे. (Santosh Bangar) वर्षानुवर्षे ज्यांचा विरोध केला त्यांच्याच प्रचार करावा लागण्याची नामुष्की तर ज्यांच्या प्रचार केला त्यांचाच विरोध करण्याची दुर्दैवी वेळ नेते व कार्यकर्त्यावर येऊन ठेपली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या वादाची या चर्चेला किनार आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटाने गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. बांगर यांचा पाडाव करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः या मतदारसंघात लक्ष घालत आहेत. अशावेळी संतोष टारफे यांचे उमेदवार म्हणून नाव समोर आल्याने ते खरचं बांगर यांना टक्कर देऊ शकतात का? याचीही चर्चा होतांना दिसत आहे.

कळमनुरी मतदारसंघात कॉंग्रेसच्या नेत्या रजनी सातव, त्यांचे पुत्र व राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलेले स्व. राजीव सातव यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच आदिवासी मतदारांची निर्णायक संख्या या मतदारसंघाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे आदिवासी नेते डॉ. संतोष टारफे यांनी विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे संतोष बांगर यांनी त्यांचा पराभव केला होता.

Hingoli Political News
Raosaheb Danve News : विदर्भातल्या मुली लग्न करून आमच्याकडे निवडणूक लढवतात , आता आम्हालाही ओबीसीत घ्या..

या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अजित मगरयांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले होते. दरम्यान शिवसेनेत झालेल्या बंडानंतर भविष्यातील संधींचा विचार करून माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावाई असलेले डॉ. संतोष टारफे यांना मतदारसंघातील आदिवासी मतदारांचे एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास अजित मगर हे सुध्दा अन्य पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट कळमनुरीची जागा लढवणार हे स्पष्ट आहे. मात्र तरीही प्रज्ञा सातव यांच्यासाठी कॉंग्रेस पक्ष कळमनुरीच्या जागेसाठी आग्रह धरू शकतो. असे झाले तर कॉंग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. एकूणच कळमनुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे जागावाटप हा प्रमुख मुद्दा तर शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळाल्यास दोन उमेदवारात रस्सीखेच असणार आहे. तसेच २०१९ चा निकालानुसार अजित मगर यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com