Shirdi crime : शिर्डी हादरली; वाढदिवस साजरा करण्यासाठी अपहरण करून खून, नशेबाज सात अल्पवयीन मुलांना अटक

Ahilyanagar Shirdi Minor Boys Kidnap and Murder Kopargaon Man After Birthday Celebration : कोपरगावमधील गणेश सखाहरी चत्तर यांचा मृतदेह आढळला असून, ते 8 जूनपासून बेपत्ता होते.
Shirdi crime
Shirdi crimeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Kopargaon crime news : शिर्डी शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून लुटल्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

गणेश सखाहरी चत्तर (वय 42, रा. हांडेवाडी, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते 8 जूनपासून बेपत्ता होते. 13 जून रोजी नांदुर्खी बुद्रुक शिवारातील बाळासाहेब कोते यांच्या ऊसाच्या शेतात (Farmer) एक अनोळखी मृतदेह आढळला. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय तपासणीत धारदार शस्त्राच्या वारामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस (Police) तपासादरम्यान मृताच्या खिशातील मोबाइल फोन सात अल्पवयीन मुलांनी चोरून स्थानिक दुकानदाराला सुमारे साडेचार हजार रुपयांना विकल्याचे समोर आले. त्या पैशातून त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. यातील एका मुलाने दुकानदाराकडून चोरीचा मोबाईल विकत घेऊन वापरायला चालू केल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला.

Shirdi crime
Imtiaz Jaleel On BJP : 'हिंदू आमच्यामुळे सुरक्षित, लोकांचा माइंड सेट केलाय'; इम्तियाज जलील यांचा भाजपच्या 'कट्टरते'वर हल्लाबोल

तपासात उघड झाल्यानुसार, गणेश चत्तर हे पायी जात असताना या अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना ऊसाच्या शेतात नेऊन, ऊसाच्या कांडक्याने व हाताने मारहाण केली. यातील एकाने गळा दाबून खून केला तर दोन जणांनी चाकूने हल्ला केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात टाकण्यात आला व त्यांच्याजवळील मोबाइल विकण्यात आला. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली.

Shirdi crime
MSRTC five regional divisions : राज्य परिवहन महामंडळाबाबत शिवसेना मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय; अंमलबजावणीचा आदेश अन् कार्यवाही सुरू

या घटनेतील काही मुलं नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती असून, त्यांच्याकडून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिर्डी व राहाता परिसरात अल्पवयीन मुलांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असून, याआधीही अशाच स्वरूपाच्या हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिर्डी परिसरात नशेखोरी आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणी पोलिस नाईक गजानन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या मुलांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com