Jalgaon News: कामे तीन कोटींची, भ्रष्टाचार नऊ कोटींचा कसा?

मुक्ताईनगर येथे आपल्यावरील आरोपांबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Chandrakant Patil- Eknath Khadse
Chandrakant Patil- Eknath KhadseSarkarnama

मुक्ताईनगर : नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर हा रस्ता मक्तेदार (Road Contractor) असलेला माझा भाचा उज्ज्वल बोरसे (Ujjwal Borse) याने उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून, रस्त्यासाठी तीन कोटी ४० लाख रुपये मंजूर होते. मग नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कसा? असा पलटवार करत आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना यांची मानसिकता ठिकाणावर आहे काय? असा प्रतिप्रश्न केला. (Chandrakant Patil & Eknath Khadse`s political war began again)

Chandrakant Patil- Eknath Khadse
NCP: युवतीवर अत्याचार होऊनही महाराष्ट्रातील `इडी` सरकार संवेदनाहीन!

खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने नऊ कोटी रुपयांची कामे न करता बिले काढल्याचा आरोप केला होता. यावर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

Chandrakant Patil- Eknath Khadse
Eknath Khadse: रस्त्याची कामे न करताच कोट्यवधींचा गैरव्यवहार?

या कामाची संयुक्त चौकशी समितीने सखोल चौकशी केलेली असून, त्या संदर्भात अहवाल देखील सादर केलेला आहे आणि हा रस्ता सुस्थितीत, रहदारीस योग्य असल्याचे म्हटले असताना खडसे यांचा आरोप केवळ बोरसे यांची बदनामी करण्याचा प्रकार आहे. या खोट्या आरोपाला उत्तर देणे संयुक्तिक वाटत नसले तरी वस्तुस्थिती जनतेसमोर येण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांनी आपल्यावर पाच कोटी रुपयांचा निधी परत पाठविण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले, की हो मी निधी परत पाठवला आहे, परंतु त्यापैकी अडीच कोटी रुपयांचा निधी केवळ खडसे यांच्या शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालयाच्या उपयोगासाठी आणण्यात आलेला होता. त्यामध्ये ६९० गट क्रमांकात पेवर ब्लॉक बसवणे (१५ लाख), मुक्ताईनगर येथील सायन्स कॉलेजनजीक एक हजार मीटर रस्त्याचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण (२५ लाख), मुक्ताईनगर येथे विज्ञान कॉलेजनजीक व्यायामशाळा बांधकाम (३५ लाख), मुक्ताईनगर येथे गट क्रमांक ६९९ मध्ये मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे (५० लाख), मुक्ताईनगर येथे मंगल कार्यालयानजीक पेवर ब्लॉक बसवणे (दहा लाख), पुनर्वसन टप्पा क्रमांक तीनमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे (२० लाख) आणि गट क्रमांक १२० च्या एकमध्ये विद्यालयानजीक मल्टीपर्पज हॉल बांधणे पन्नास लाख रुपये, अशी जवळपास अडीच कोटी रुपयांची कामे खडसे यांच्या वैयक्तिक संस्थेच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार होती.

गोदावरी मंगल कार्यालयाचा देखील उल्लेख करत मंगल कार्यालयाचे बांधकाम खासदार व आमदार निधीतून करण्यात आले असून, या मंगल कार्यालयातून वर्षभर येणारे भाडे तत्त्वावरील उत्पन्न हे स्वतःच्या खिशात खडसे घालत असून, हा खरा भ्रष्टाचार आहे, असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. प्रत्यक्ष सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाला म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काल खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमागे महापुरुषांच्या पूजनप्रसंगी सॅंडल घालून ते गेल्याने त्यावर वाद होऊ नये म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर व माझ्या भाच्यावर आरोप केलेला आहे.

आदिशक्ती मुक्ताईच्या दानपेट्यांचा पैसा कुठे जातो? संत निवासाच्या उपयोग कुणासाठी केला जातो? तुमचा भाचा कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे, हे सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माझ्या आमंत्रणावरून दुसऱ्यांदा येत आहेत, हे त्यांना पचनी पडत नसून आसुये पोटी ते आरोप करत आहेत. घराणेशही, जनसंवाद यात्रा यावरही त्यांनी टीका केली. बकालेंविषयी खडसे यांनी चकार शब्दाने देखील काढला नाही. किंवा बकाले याचा निषेध केला नाही, यासंदर्भात मानसिकता काय? हे दिसून येत असल्याचा आरोप देखील आमदार पाटील यांनी याप्रसंगी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com