Devyani Pharande News : आमदार फरांदेंचा अजब दावा; म्हणतात, 'तो तर जुगाराचा अड्डा '

Bjp Vs Shivsena Politics News : संबंधित अतिक्रमण कारवाईशी आपला काहीही संबंध नाही. मी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त होते. मी ठरवले असते तर दहा वर्षांपूर्वीच ते अतिक्रमण पाडले असते. मी सुडबुद्धीने काम करत नाही, असेही भाजप आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले.
Devyani Pharande, Vasant gite
Devyani Pharande, Vasant giteSarkarnma
Published on
Updated on

Devyani Pharande Vs Vasant Gite News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यालय शनिवारी महापालिकेने जमीनदोस्त केले. याप्रकरणी भाजप आमदार फरांदे यांनी राजकीय दबाव टाकून ही कारवाई केल्याचा आरोप वसंत गीते यांनी केला होता. अतिक्रमण पाडण्याच्या कारवाईनंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.

या संदर्भात रविवारी आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी पत्रकार परिषद घेतली. संबंधित अतिक्रमण कारवाईशी आपला काहीही संबंध नाही. मी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त होते. मी ठरवले असते तर दहा वर्षांपूर्वीच ते अतिक्रमण पाडले असते, असे सांगत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळले. (Devyani Pharande News)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जे अतिक्रमण पाडले, तेथे जुगाराचा अड्डा होता. पाच वर्षांपूर्वी देखील येथे जुगाराचा अड्डा सुरू होता. ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. असा खळबळजनक आरोपही आमदार फरांदे यांनी केला.

दारूचे आणि जुगाराचे अड्डे चालविणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करू नये. अशास्वरूपाच्या आरोपांना मी घाबरत नाही. प्रत्येकाला उत्तर देण्यास मी सक्षम आहे. मी रस्त्यावर काम करणारी कार्यकर्ती आहे. लोकांमध्येच वावरते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना भीक घालणार नाही, असा इशारा भाजपच्या आमदार फरांदे यांनी दिला.

Devyani Pharande, Vasant gite
Supriya Sule News : आता त्यांना लाडकी बहीण, भाऊ सगळे आठवतील; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

आमदार फरांदे यांनी माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, जी व्यक्ती महापौर, आमदार तसेच त्यांचा मुलगा उपमहापौर होता. त्याने डीपी रोडमध्ये अतिक्रमण करून कार्यालय बांधले होते. गेली 40 वर्ष ते कार्यालय येथे होते.

त्यांच्या दबावामुळे महापालिका कारवाई करू शकली नव्हती. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीने असे गैरप्रकार करावे का? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

Devyani Pharande, Vasant gite
Action on Vasant Gite Office : वसंत गीतेंचे कार्यालय पाडण्यासाठी मोठा फौजफाटा दाखल; मुंबईनाका परिसरात तणाव!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com