DPDC meeting of Nashik: आमदार फरांदे म्हणतात, नाशिक शहर अंमली पदार्थाच्या विळख्यात!

`डीपीडीसी`च्या बैठकीत विकासकामांऐवजी अंमली पदार्थाचीच चर्चा गाजली
Dada Bhuse & Devyani Pharande
Dada Bhuse & Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा (Nashik) नियोजन समितीच्या बैठकीत, आज अखर्चित निधीवर चर्चा झाली, पण सोबतच सर्वाधिक चर्चा शहरातील अवैध धंद्यावर (Drugs) रंगली. शहर अमली पदार्थाच्या विळख्यात सापडले आहे. शहर पोलिसांचे (Police) पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत आमदारांनी कारवाईची मागणी केली. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. (Drugs supply & Illegal activities discussion in DPDC meeting of Nashik)

Dada Bhuse & Devyani Pharande
Suhas Kande News: तुमच्यासाठी जेलमध्ये जायला देखील तयार आहे!

नियोजन भवनात झालेल्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी अमली पदार्थाच्या विक्रीच्या विळख्यात शहर सापडले आहे. अर्ज, निवेदन देऊनही पोलिसांकडून कारवाई होत नाही, असा आरोप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.

Dada Bhuse & Devyani Pharande
Ambadas Danve News: शाईफेक कशामुळे झाली याचाही विचार करणार की नाही?

महापालिकेच्या उद्यानात गांजा विक्री सुरू आहे. टपऱ्यांवर अमली पदार्थ मिळविण्यासाठी कोड आहेत. विशिष्ट कोड सांगितल्यानंतर खुलेआम अमली पदार्थ मिळतात. त्यातून गुन्हेगारी वाढली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त असून सामान्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा अशी मागणी केली. इतर आमदारांनी सुरात सूर मिसळत एका बाजूला ग्रामीण पोलिसांचा दरारा वाढत असताना शहरातील पोलिसांचा मात्र, गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याच्या तक्रारी केल्या.

११२ क्रमांकावर संपर्क साधा

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आमदारांच्या तक्रारीवर उत्तर देताना स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करता येणार नाही मात्र, आहे त्या ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या १५ मिनिटात शहर पोलिसांकडून प्रतिसाद मिळेल याची ग्वाही दिली. शहरात अमली पदार्थाच्या आणि महापालिकेच्या उद्यानातील गांजा विक्री प्रतिबंधासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहेत. त्यांच्या कारवाई सुरू झाली आहे. लवकरच त्याचा परिणाम दिसेल असा दावा केला.

निकालाचा गैरअर्थ काढला

सारुळ येथील खाणीला प्रतिबंध केला असताना पुन्हा उत्खनन सुरू असल्यावर चौकशीची मागणी झाली. त्यात, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी न्यायालयीन आदेशानुसार कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यात, न्यायालयाच्या आदेशाचा गैरअर्थ लावून खाणपट्टेधारकांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप झाला. दिलीप बोरसे यांनी मात्र, ग्रामीण पोलिसांच्या कारवायांचे कौतुक करीत, ग्रामीण भागातील मोहीम अशाच सुरू ठेवण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील इतर आमदारांनी ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com