Nashik Centre constituency: भाजपकडे वाढले इच्छुक, सर्वसमावेशक उमेदवाराचा शोध?

MLA Devyani Pharande politics, Aspirants to BJP have increased in the struggle for candidacy-नाशिक मध्य मतदारसंघात भाजपला यंदा जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Devyani Pharande, Suresh Patil & Himgauri Adke
Devyani Pharande, Suresh Patil & Himgauri AdkeSarkarnama
Published on
Updated on

Devyani Pharande News: गेली दोन टर्म नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. यंदा त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्या हॅट्रिक करतील. मात्र त्यांच्या मार्गात पक्षातीलच प्रबळ इच्छुक उमेदवारांचे गतीरोधक आहे.

नाशिक शहरात सध्या नाशिक मध्य मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आपली जागा राखण्यासाठी अटीतटीची लढत द्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात एक गट पक्षाच्या वरिष्ठांकडे लॉबिंग करण्यात व्यस्त आहे.

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देतो याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी वाटते.

या मतदारसंघात चार ते पाच इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी आणि माजी नगरसेविका हिमगौरी आडके -आहेर यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.

Devyani Pharande, Suresh Patil & Himgauri Adke
Gulabrao Patil Politics: अजित पवारांना घरचा आहेर, मंत्र्याचा संताप, म्हणाले, हे तर सर्वात नालायक...

हे तिन्ही उमेदवार प्रबळ व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलेले आहेत. त्यांचे पक्षश्रेष्टींकडे स्ट्राँग कनेक्शन त्यांच्या उमेदवारीची वाच सोपी करू शकतो. सुरेश पाटील यांच्या नावाची यापूर्वी उमेदवारीसाठी चर्चा होती. मात्र ऐनवेळी आमदार फरांदे यांनी संधी मिळाली. सर्वसमावेषक व कोणताही वाद विवाद नसलेला उमेदवार म्हणून यंदा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

यंदा ही निवडणूक महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवारामुळे भाजपला वेगळे प्रयोग करून जिंकावी लागेल, असे चित्र आहे. त्यासाठी उमेदवार हा अतिशय महत्त्वाचा निकष असेल. विद्यमान आमदार फरांदे या पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Devyani Pharande, Suresh Patil & Himgauri Adke
Asif Shaikh Politics: धक्कादायक, `एमआयएम` आमदार मौलाना यांनी ३५ हजार बनावट मतदार नोंदविल्याचा आरोप!

या मतदारसंघात यंदा मुस्लिम मतदार हा फॅक्टर आहे. मराठा आरक्षण आंदोलन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यादृष्टीने उमेदवाराला मतदारांत जाऊन प्रचार करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व इच्छुक सावध पावले टाकीत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com