Kishor Patil Politics: पाचोरा-भडगाव मतदार संघात पुन्हा एकदा अमोल शिंदे, दिलीप वाघ यांचे बंडाचे निशाण!

Kishore Patil's Rebellion in the Mahayuti is Major Hurdle: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशींच्या संवाद यात्रेने पाचोर्‍यात निवडणुकीचे राजकारण पेटले!
Amol Shinde, Dilip Wagh & Kishor Patil
Amol Shinde, Dilip Wagh & Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs Shivsena: पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची परंपरा यंदाही कायम आहे. विशेषतः महायुतीमध्ये एक नव्हे तर दोन्ही पक्षांनी थेट अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेत बंड झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या हा घाईगडबडीतील निर्णय त्यांची अडचण ठरण्याचे चिन्हे आहेत. आता त्यावरून त्यांच्याच कुटुंबातून वैशाली सूर्यवंशी या भगिनीने त्यांना आव्हान दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीमती सूर्यवंशी या उमेदवार असतील असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत. दोन दिवसांपासून श्रीमती सूर्यवंशी यांनी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा सुरू केली आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि मतदारांत चर्चा होईल अशा पद्धतीने ही यात्रा सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक मंडळाला भेटी दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांशी संवाद होत आहे. विधानसभा निवडणुकीचा हा थेट प्रचार आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सूर्यवंशी या सक्रिय झाल्याने मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार पाटील देखील कामाला लागले आहेत.

Amol Shinde, Dilip Wagh & Kishor Patil
Sanjay Shirsat Politics: संजय शिरसाट का संतापले?, कोणाला म्हणाले बिनडोक!

मात्र आमदार पाटील यांच्या मार्गात महायुतीच्याच घटक पक्षांनी मोठा अडथळा निर्माण केला आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार पाटील अवघ्या एक हजार ८०० मतांनी विजयी झाले होते.

अपक्ष दिलीप वाघ यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. गेली पाच वर्ष श्री. वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय होते. या कालावधीत त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू ठेवली होती. आता त्यांनी महायुतीचा आघाडी धर्म पाळणार नाही, अशी घोषणा केली आहे.

श्री. वाघ यांचा मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. त्यामुळे सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. तरीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांना भेटीसाठी निरोप दिला होता. श्री वाघ यांनी देखील या दोन्ही नेत्यांची भेट घेतली आहे. जो उमेदवारी देईल त्याचा झेंडा हाती घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Amol Shinde, Dilip Wagh & Kishor Patil
Mahatma Phule : सरसंघचालक मोहन भागवत यांनी इतिहास बदलू नये, महात्मा फुले अभ्यासावेत!

पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारीची घोषणा श्री. वाघ यांनी यापूर्वीच केली आहे. या अडचणी कमी होत्या की काय म्हणून भारतीय जनता पक्षाचे अमोल शिंदे यांनीही आमदार पाटील यांना आव्हान दिले आहे. भाजपचे शिंदे हे देखील अपक्ष उमेदवारी करणार आहेत.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची परंपरा कायम असेल. यंदा थेट चौरंगी लढतीचे चित्र या मतदारसंघात आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांना घरातूनच मोठे आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे महायुतीच्या गटात समाविष्ट झालेल्या आमदार पाटील महायुतीत सहकारीच बंड करीत असल्याने एकटे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाशी बंडखोरी केल्याचा त्यांचा राजकीय बंडखोरीचा निर्णय अंगलट येतो की काय अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com