Sanjay Shirsat Politics: संजय शिरसाट का संतापले?, कोणाला म्हणाले बिनडोक!

Sanjay Shirsat Angry on MP Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ यांनी राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असा दावा केला.
Sanjay Shirsath & Sanjay Raut
Sanjay Shirsath & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde News: शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच झुंज लागली आहे. रोजच त्याबाबत आरोप, प्रत्यारोप सुरू असतात. यासंदर्भात आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

आमदार शिरसाठ यांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर शेलकी टीका केली आहे. खासदार राऊत यांना राजकारणातले काहीच कळत नाही. ते आत्ता आत्ता आले आणि काहीही बोलायला लागले. त्यामुळे त्यांना आम्ही अजिबात भाव देत नाही, असे शिरसाठ म्हणाले आहेत.

खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार शिरसाठ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेनेतील राजकारण आणि धोरण या दोन्ही बद्दल राऊत यांना फारशी माहिती नाही. ज्या सर्व गोष्टींचा उल्लेख ते करतात, तेव्हा त्यांना शिवसेनेत काहीच महत्त्व नव्हते. तेव्हा ते चित्रलेखा साप्ताहिकात चित्रपटातील हीरो, हीरोइनचे फोटो छापत होते.

खासदार राऊत यांना याविषयी काही माहीत असण्याचे कारणच नाही. खासदार राऊत यांना तर मुंबई आणि बॉम्बे यातला फरक देखील समजत नव्हता. त्यामुळे अशा बिनडोक माणसाची दखल आम्ही घेत नाही. आम्हीच काय कोणीही त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही, असा दावा यावेळी त्यांनी केला.

Sanjay Shirsath & Sanjay Raut
Sharad Pawar News: 'तुतारी'मीच फुंकणार! 'या' मतदारसंघातून दररोज एक जण शरद पवारांच्या भेटीला

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत ते म्हणाले, महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कोणताही वाद नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये नियमित संवाद होतो. जागा वाटपाचे धोरण काय असेल आणि कोणत्या जागा कोणाला सोडायच्या याचा निर्णय महायुतीच्या समितीचे हे तिन्ही नेते घेणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत चर्चा देखील सुरू झालेली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कोणी किती जागा लढवायच्या याचा आढावा घेण्यात आलेला आहे.

या तिन्ही नेत्यांची कोअर कमिटी त्याबाबत पुढील निर्णय घेईल. महायुतीमध्ये अन्य घटक पक्षांना देखील सामावून घेतले जाणार आहे. त्यानुसार जागावाटप होईल.

Sanjay Shirsath & Sanjay Raut
Mahatma Phule : सरसंघचालक मोहन भागवत यांनी इतिहास बदलू नये, महात्मा फुले अभ्यासावेत!

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय खूप लांब नाही. पुढील आठवड्यात जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल. जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या प्रचाराला दिशा मिळेल, असा दावा आमदार शिरसाठ यांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्याबाबत अतिशय सावध पावले टाकली जात आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी अनेक मतप्रवाह या नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जाते.

राज्यातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक तसेच विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यावर पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय देखील पुढे येऊ शकतो. अशा स्थितीत श्री शिरसाठ यांनी पुढील आठवड्यात याबाबतच्या निर्णयाची घोषणा होईल, असे संकेत दिले आहे. महायुतीतील इच्छुक उमेदवारांची उत्सुकता त्यामुळे वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com