Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी यासाठी मानले नितीन गडकरींचे आभार

Anand Mahindra : गडकरींनी केलेल्या नियमाबाबत त्यांचे आभार मानले आहेत. महिंद्रा यांनी याबाबत टि्वट केले आहे.
Nitin Gadkari, Anand Mahindra
Nitin Gadkari, Anand Mahindrasarkarnama

Anand Mahindra : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या अनोख्या टि्वटमुळे आनंद महिंद्रा यांचा उद्योगक्षेत्राबरोबरच समाज माध्यमांवरही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानले आहे. (Anand Mahindra latest news)

समाज माध्यमांवर आनंद महिंद्राच्या पोस्ट नेहमीच विचारपूर्वक व मार्गदर्शक असतात. अशीच पोस्ट त्यांनी नुकतीच केली. यात त्यांनी वाहनांच्या पुढील व मागील भागावर असलेले सुरक्षा गार्ड ( RUPD रियर अंडर रन प्रोटेक्शन डिवाइस) बाबत गडकरींनी केलेल्या नियमाबाबत त्यांचे आभार मानले आहेत. महिंद्रा यांनी याबाबत टि्वट केले आहे.

अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी हे सुरक्षा गार्ड (RUPD) महत्वाचे असल्याचे आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. ग्लोबल सॉफ्टवेयर कंपनीच्या टि्वटला रिटि्वट करीत याचे महत्व पटवून दिले आहे.

Nitin Gadkari, Anand Mahindra
Sanjay Raut : नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ? ; राऊतांनी डिवचलं

नितीन गडकरी यांनी २०१४ मध्येच वाहनांना RUPD बसविण्याचे सक्तीचे केले आहे, त्यामुळे अपघातात वाहनाचे कमीत कमी नुकसान होते, वाहनचालकांना ही सक्ती केल्याने महिंद्रा यांनी गडकरींचे आभार मानले. RUPD मुळे वाहनामधील प्रवाशांचे प्राण वाचू शकतात, असे महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

काही दिवसापूर्वी आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली होती. जनावरांचं अस्तित्व धोक्यात टाकून होत असलेला विकास किती उचित आहे ? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. जंगलातून जाणाऱ्या हायवेमुळे अनेक जनावरांना भरधाव गाडीखाली आल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. यावरचा उपाय म्हणून आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना एक कल्पना दिली होती.

Nitin Gadkari, Anand Mahindra
Sai Resort : अनिल परबांचे पाय आणखी खोलात ? ; दोन महिन्यात चौथा गुन्हा दाखल

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नेदरलँडच्या जंगलामधल्या एका ब्रीजचा फोटो होता. या ब्रीजच्या माध्यमातू जंगलातली जनावरं हायवेच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. रस्ता क्रॉस करण्यासाठी या जनावरांना हायवेवरून जाऊन जीव धोक्यात घालण्याची गरज पडत नाही,असे म्हटलं होते. त्यानंतर गडकरींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गात प्राण्यांसाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com