Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Administrator Arun Kadam in NDCC Meeting
Administrator Arun Kadam in NDCC MeetingSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (NDCC Bank) ढासळलेली आर्थिक पत (Financial status) सुधारविण्याच्या दृष्टीने थकीत कर्जदारांच्या (Debtor) नातेवाईकांच्या ठेवीतून संमतीने कर्जवसुली (Recovery of loan) करण्याचा निर्णय जिल्हा बँक सदस्यांनी घेतला. या निर्णयामुळे वसुली चांगली होऊन बँकेची आर्थिक पत सुधारण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच झाला. (Nashik district bank take a serious decision in general body meeting)

Administrator Arun Kadam in NDCC Meeting
NCP News: देश विकायला भाजपला बारामतीची जागा हवी आहे का?

बँकेची ६८ वी सर्वसाधारण सभा आज प्रशासक अरुण कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी जिल्हा भरातून आलेल्या सदस्यांनी बँकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अनेक ठराव मांडत सूचना देखील केल्या.

Administrator Arun Kadam in NDCC Meeting
MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

सभेसाठी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजेंद्र डोखळे, विश्‍वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, राजेंद्र भोसले, मविप्र संस्थेचे माजी सभापती माणिकराव बोरस्ते, शिवाजी ढेपले, कॉम्रेड राजू देसले, राजाराम जाधव, अनिल वाघ, केदू गुंजाळ, भाऊसाहेब चव्हाण, अरविंद निगाडे यांच्यासह तालुक्यातील सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. पिंगळे यांनी बँकेच्या कामाचा आढावा मांडत कर्जवसुली, थकीत कर्ज याबाबत विस्तृत माहिती दिली.

एनपीए पोचला ६९ टक्क्यांवर

प्रशासक कदम यांनी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस स्वरुपात कर्जवसुली करण्याची खरी गरज असल्याचे सांगितले. बँकेची कर्जवसुली अपेक्षितरित्या झाली नाही तर रिझर्व्ह बँकेकडून बँकेचा परवाना देखील रद्द होवू शकतो. मात्र ही वेळ आपणावर येऊ नये म्हणून आम्ही सर्वोत्तपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या ६७ हजार थकबाकीदार सभासदांकडे एक हजार ६१४ कोटी रुपये पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत असल्याने बँकेचा ग्रॉस एनपीए ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यावर उपस्थित सदस्य थकीत कर्जदार यांच्या नातेवाईकांच्या बँकेत असलेल्या ठेवीतून कर्ज वसुल करण्याचा मुद्दा उपस्थित करत दोघांच्या संमतीने बँक नातेवाईकांच्या ठेवीतून कर्ज वसुल करण्याची सवलत बँकेस दिली. मात्र या प्रकियेत चालू कर्जदार यांना सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्टीकरण बँक प्रशासनाने दिले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com