Rohit Pawar News : रोहित पवारांकडून पोलखोल ? कांदा खरेदीचा निर्णय १७ ऑगस्टलाच : केंद्र-राज्य सरकारची 'अशीही बनवाबनवी' !

Onion Issue : कांदा खरेदीचा निर्णय १७ ऑगस्टलाच झाला होता असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावला आणि महाराष्ट्रात कांदा पट्यात एकच गहजब उडाला. शेतकरी चिडले तर स्वाभिमानी, किसान सभा, स्वतंत्र भारत पक्षाने सरकार विरोधात एल्गार पुकारला. पाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी, बीआरएस आदी पक्षांनीही रस्त्यांवर उतरत सरकारला धारेवर धरले. एकंदरीत परिस्थिती पाहता मंगळवारी (22ऑगस्ट) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत धडकले तर जपान दौर्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोनवर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. लागलीच २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले.

मंगळवारी घडलेल्या घटना ह्या आजच्या असल्या तरी केंद्र सरकारने मुळात दोन लाख टन कांदा खरेदीचा निर्णय आणि कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लागू करण्याचा निर्णय असे दोन्ही निर्णय हे १७ ऑगस्टला घेऊन ते २० ऑगस्टला घोषित केल्याची 'पोलखोल' रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. याबाबत सुरू असलेले श्रेय वादावरून कोण कुणाला वेड्यात काढतेय असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

MLA Rohit Pawar
Nana Patole News : 'भारत जोडो'नंतर आता काँग्रेसची 'जनसंवाद पदयात्रा' ; महाराष्ट्र पिंजून काढणार

निर्णय जर तीन-चार दिवसांपूर्वीच झाला तर मग, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आज दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली ? उपमुख्यमंत्री साहेबांनी जपानमधून फोनवरून केंद्रीय मंत्र्यांशी काय संवाद साधला ? आणि मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारचे कशाबद्दल कौतुक केले ? असे असे सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी श्रेय घेण्याच्या नादात किती बनवाबनवी करणार ? असा खोचक सवाल उपस्थित केला.

कृषिमंत्री दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशी बैठक करतात, उपमुख्यमंत्री जपानमधून फोन करतात आणि केंद्र सरकार शेतकरी हितासाठी २ लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचे ट्विटर वरून घोषितही करतात. त्यावर भर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या २ लाख टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचे अफाट कौतुक करतात.

MLA Rohit Pawar
Onion Export Issue : कांद्याचा वांदा : फडणवीसांकडून मित्रपक्षांना जपानमधून 'कोलदांडा'

जर २ लाख टन अतिरिक्त कांदा खरेदी करण्याचा निर्णय तीन-चार दिवसांपूर्वीच झाला होता तर मग, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आज दिल्लीला जाऊन नेमकी काय चर्चा केली, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. केंदीय मंत्री पियुष गोयल साहेबांनी राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब (Eknath Shinde) यांना वेड्यात तर काढले नाही ना ? किंवा राज्य आणि केंद्र सरकार मिळून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना ? असा चिमटा रोहित पवार यांनी काढला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com