Satyajeet Tambe : आमदार तांबेंना अकोलकर वाड्यावर सापडला 'सुर्या'त लहानपणीचा सत्यजीत !

Political : तांबे परिवाराचा राजकीय रुतबा राज्याच्या राजकारणात मोठा असला तरी...
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: असं म्हणतात जुन्याआठवणी या भविष्यातील जीवनाच्या सोबती असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात या आठवणींना अन्यन्य महत्व असते. या आठवणी कधी मनाला उभारी करतात, कधी निराश करतात, तर कधी मनाला उभारी देत जीवनाला नवी दिशा देतात.

ज्यांच्याकडे चांगल्या आठवणींचा ठेवा त्याला जगी नाही दुरावा! या आठवणींच्या हिंदोळ्यावर आयुष्य जगावे लागते हेच जीवनाचे सत्य.. आणि याला कोण अपवाद ? तर कोणीच नाही! अशाच लहानपणीच्या आठवणी आमदार सत्यजीत तांबे यांना ऐन दिवाळीत थंड गारव्या सारख्या शहारून गेल्या आणि त्यांनी थेट गाठला अकोलकर वाडा.

संगमनेर शहरात चंद्रशेखर चौकात असलेला हा अकोलकर वाडा म्हणजे माजी आमदार सुधीर तांबे यांचे त्यावेळचे भाड्याचे निवासस्थान. डॉ.सुधीर तांबे डॉक्टर झाले आणि त्यांनी नेहरू चौकात आपली छोटेखानी प्रॅक्टिस सुरू केली. सेवाव्रत हे डॉ. सुधीर तांबे यांची ओळख पार जुनी. संसार थाटण्यापूर्वीची. त्यांचा हाच सेवाभाव आणि ग्रामीण भागातील रुग्णांबरोबरची सलगी माजी मंत्री दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना भावली आणि त्यांनी दुर्गाताईंचे लग्न डॉ.सुधीर तांबे यांच्याशी लावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satyajeet Tambe
Ajit Pawar News : अजित पवार अखेर गोविंदबागेत दाखल ; दिवाळी पाडव्याला दांडी,पण स्नेहभोजनाला उपस्थिती...

अगदी छोटेखानी डॉक्टरकीची प्रॅक्टिस त्या काळी त्यांनी दुर्गाताईंच्या सोबतीने केली. दवाखान्या जवळच निवासस्थान असावे म्हणून त्यांनी अकोलकर वाड्यावर अनेक वर्षे वास्तव केले. सत्यजित यांचा जन्म तिथेच झाला. लहानपण त्यांचे त्याच वाड्यावर गेले. आज सत्यजीत हे नाशिक पदवीधर मतदातसंघांचे आमदार आहेत. वडील डॉ.सुधील तांबे आणि नगराध्यक्षा दुर्गताई तांबे यांचे पुत्र आणि मामा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे.

मात्र, आज काळाच्या ओघात तांबे परिवाराचा राजकीय रुतबा राज्याच्या राजकारणात मोठा असला तरी आमदार सत्यजीत तांबे यांच्या मनात लहानपणीच्या आठवणी यंदा जागवल्या. या आठवणी जागृत होण्याचे कारण म्हणजे त्यांचे लहानगे चिरंजीव सुर्या. आपणही सूर्याच्या वयाचे असताना कुठे होतो, याची आठवण त्यांना झाली आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सूर्याला घेऊन थेट अकोलकर वाडा गाठला. तिथे गेल्यानंतरच्या भावना सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या, त्या अशा...

'सूर्या'सोबत अकोलकर वाड्यावर !

"सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजेच २४ मार्च १९८३ रोजी माझ्या पप्पांनी संगमनेरच्या नेहरू चौकातील पानसरे गल्लीत आपला दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसाय म्हटल्यावर २४ तास उपलब्ध राहणं आलं. त्यामुळे दवाखान्याच्या जवळच राहण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर चौकातील अकोलकर वाड्यात माझे मम्मी-पप्पा राहायला गेले. माझा जन्म झाला तेव्हा आम्ही याच अकोलकर वाड्यात राहत होतो.

१९३५ साली बांधलेला या जुन्या वाड्यातच माझं बालपण गेलं. ज्येष्ठ वकील असलेले अकोलकर दादा आणि अतिशय प्रेमळ अशा त्यांच्या पत्नी अकोलकर ताई यांच्या संस्कारातच मी वाढलो. अकोलकर ताईंच्या हातचे दही-दूध-भात, बेसनाचे लाडू हे माझ्या अतिशय आवडीचे पदार्थ. अगदी ५-७ वर्षांपूर्वीपर्यंत-त्या हयात असेपर्यंत मी आवडीने आणि हक्काने अगदी आवर्जून त्यांच्याकडे जायचो.

आजही सूर्याला घेऊन अकोलकर वाड्यावर गेलो आणि अकोलकर परिवारातील संजयकाका, अरुणा मावशी, देव यांची भेट घेतली. अरुणा मावशी व माझी मम्मी योगायोगाने कॉलेजच्या मैत्रीणीच! सूर्याला बघून सगळ्या अकोलकर परिवाराला माझेच लहानपण आठवले. मलाही माझं बालपण आठवलं! जुन्या आठवणी पुन्हा एकदा अगदी काल घडल्याप्रमाणे लख्खपणे पुढ्यात येऊन उभ्या राहिल्या".

Edited by : Ganesh Thombare

Satyajeet Tambe
Jayakwadi Water Issue : आमदार काळेंनी सरकारला पुन्हा ठणकावले; ‘जायकवाडीला पाणी सोडल्यास हायकोर्टाचा अवमान...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com