Satyajeet Tambe News : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या मदतीसाठी आमदार सत्यजित तांबे धावले; दिली 'ही' ग्वाही

Nashik News : ग्रामविकास विभागाच्या निर्णयात अनेक त्रुटी....
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

Nashik : नाशिकपदवीधर मतदार संघामध्ये चर्चेत असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील दौरे, भेटीगाठी, बैठका यांचा धडाका लावला आहे.आता सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटींपर्यंत नोंदणीकरण द्यावे, ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयातील त्रुटी दूर कराव्यात आदी मागण्या महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने नाशिक(Nashik) पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे करण्यात आली. अभियंत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

Satyajeet Tambe
Ajit Pawar News : ‘लाँग मार्च’ काढून प्रश्न सुटत नसतात; अजित पवारांचा ‘CPM’च्या जे. पी. गावितांना टोमणा

महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटींपर्यंत नोंदणीकरण द्यावे, ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयातील त्रुटी दूर कराव्यात आदी मागण्या महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याकडे करण्यात आली. अभियंत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

सत्यजीत तांबे म्हणाले, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला. या शासन निर्णयात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी सुशिक्षित बेरोजगार अभियंतासाठी मारक असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शासन निर्णयात बदल करावा अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.(Latest Marathi News)

Satyajeet Tambe
Hanumant Pawar Slams Sudhir Mungatiwar : पवारांचा एकेरी उल्लेख, मुनगंटीवारांवर काँग्रेस संतप्त ; 'सत्तेच्या मस्तीतून ..'

तांबे नेमकं काय म्हणाले ?

सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची नोंदणीची मुदत संपल्यानंतर त्यांना बेरोजगार अभियंता संघटनेचा पदाधिकारी, सदस्य राहता येणार नाही. या अटीमध्ये बदल करून संघटनेचा उपविधीप्रमाणे करण्यात यावी आदी मागण्या संघटनेचे अध्यक्ष निर्सगराज सोनवणे यांनी मांडत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावरील अन्याय दूर करून न्याय द्यावा अशी मागणी केली. अभियंत्यांचे प्रश्न लक्षात आले असून ते सोडविण्यासाठी काम करणार असल्याचं आमदार तांबे यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com