Ajil Pawar News : कळवण विधानसभा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्यातील विकासाच्या योजनांसाठी सर्वस्व पणाला लावू. जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हतगड येथे झालेल्या शेतकरी व कृतज्ञता मेळाव्याप्रसंगी केले. (Ajit Pawar assures tribles for devolopment of Kalwan region)
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, श्रीराम शेटे, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, अशोक सावंत, कौतिक पगार, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती अरिंगळे आदी या वेळी उपस्थित होते.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, सध्याचे सरकार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असून राज्यात व देशात जातीय दंगली घडविण्याचे काम सुरु आहे. फोडाफोडीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही. या सरकारने आदिवासींच्या अनेक योजना बंद केल्या आहेत. शिवसेनेशी गद्दारी करून हे सरकार स्थापन झाले आहे. ‘पन्नास खोके; एकदम ओके’ असे आता बारके पोरेही बोलू लागली आहेत. (Ajit Pawar's Taunting to JP Gavit )
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ती नुकसान भरपाई अद्यापही दिली नाही. अडचणीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात नाही. कांदाला अनुदान जाहीर केले. मात्र, अद्याप तरी पदरात काही पडलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे हा प्रश्न भेडसावत आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केले जात आहेत, हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. बेरोजगारी हटवा, कामे करा, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वेळ मारुन नेणारे नाहीत.
सुरगाणा तालुक्यातील पर्यटन, रोजगार, शेती सिंचन, आरोग्य, वन जमीन, वीज, रस्ते, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्यात मोर्चे, आंदोलन हेच वर्षानुवर्षे सुरु आहे. नुसतेच मोर्चा काढून प्रश्न सुटत नसतात. जे मोर्चात पायी चालतात, त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. काहीजण मोर्चे काढून सरकारला वेठीस धरुन आपले स्वत:चे प्रश्न मार्गी लावत असतात, हे आदिवासी बांधवांनी आता हुशारीने ओळखले पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.