सुहास कांदे म्हणतात, आता मी कुठे जातोय, हे माहीत नाही!

आमदार सुहास कांदे सध्या बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समवेत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
Suhas Kande News, Nashik Latest Marathi News
Suhas Kande News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी व्यक्तीगत बाईट पाठवला आहे. त्यात ते म्हणतात, मला शिवसेना (Shivsena) सोडायची नाही. पण आता कुठे जातोय, हे माहीत नाही. मी हिंदुत्व सोडणार नाही, शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व मला सोडायचं नाही.(Suhas Kande News in Marathi)

Suhas Kande News, Nashik Latest Marathi News
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहत असताना शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नेमके कोठे आहेत, यासंबंधी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मातोश्रीच्या अतिशय निकटच्या आमदाराच्या यादीत अग्रक्रमातले नाव म्हणून आमदार सुहास कांदे यांची ओळख असताना दिवसभरातील वाहिन्यांवर त्यांच्या नावासंबंधी होणारा उल्लेख व त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे. (Nashik Latest Marathi News)

Suhas Kande News, Nashik Latest Marathi News
एकनाथ शिंदेंच्या बंडाने हिरावले आमदार भोंडेकरांचे महामंडळ...

आमदार सुहास कांदे हे शिवसेनेसोबत की एकनाथ शिंदे यांच्यासोबत, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली ती त्यांच्या नॉट रिचेबल असल्यामुळे. स्वतः आमदार सुहास कांदे हे जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत काही कळणार नाही, असे सांगत स्थानिक शिवसेना नेत्यांनी याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, राज्यातील सत्ताबदलाचा जेव्हा म्हणून प्रसंग उद्‍भवत गेले त्या त्या वेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तत्कालीन आमदारांच्या भूमिका निर्णायक राहिल्या आहेत. १९७८ मध्ये जेव्हा म्हणून पुलोदच्या निमित्ताने राज्यातील आघाडीच्या सरकारचा प्रयोग झाला तेव्हा आमदार असलेल्या कन्हय्यालाल नहार यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. अगोदर वसंतदादा पाटील नंतर शरद पवार या मुख्यमंत्र्यांच्या मागे कन्हूशेठ नहार यांनी महत्त्वाचा रोल निभावला.

त्यानंतर १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या विरोधात पक्षांतर्गत वादळ उभे राहिले. अशा काळात चांदवडचे शिरीषकुमार कोतवाल यांच्या समवेत नांदगाव मतदारसंघाचे तत्कालीन आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या नावाचा मोठा गाजावाजा झाला होता. मात्र काँग्रेसच्या या बंडाळीत ॲड. अनिल आहेर यांनी अचानक भूमिका बदलवत तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख याना थेट फोन करीत आपण ठाण्यात अडकून पडलो, असे कळविले तेव्हा ठाण्यातून ते थेट मुंबईला वर्षावर दाखल झाले.

त्यांचे बंड चहाच्या पेल्यातील ठरले. आजच्या घडामोडीत ज्यांच्यामुळे महाआघाडीचे सरकार संकटात सापडले आहे ते एकनाथ शिंदे हेही ठाण्यातील नेते आहेत अन् योगायोगाने त्यांच्या शिवसेनेतील बंडासाठी सहभागी झालेल्या यादीत नांदगावच्या आमदार असलेल्या सुहास कांदे यांच्या नावाचा समावेश दिसत असल्याने ठाणे व नांदगावच्या नात्यातील राजकीय अन्वय अशारीतीने पुढे आला आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com