आमदार तनपुरेंनी 'या' मागणीसाठी नगर-मनमाड राज्य महामार्गावर केला रास्तारोको!

असंवेदनशील, घोटाळेबाज, स्थगिती अन् वसुली सरकार म्हणत सरकारवर केली टीका
MLA Tanpure
MLA TanpureSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळनगर रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.

आमदार तनपुरे यांनी टीका करताना सरकारविरोधात शेलकी विशेषणे वापरली. विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचे काम सरकार करत आहे. असंवेदनशील, घोटाळेबाज, स्थगिती, वसुली सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन असल्याचे आमदार तनपुरे यांनी म्हटले.

राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळानगर या जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील रस्त्याचे काम विलंब होत आहे. ठेकेदार वेळ काढूपणा करत आहे. या मार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुळा डॅम फाटा येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) म्हणाले, "रस्त्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार असताना प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु पुढील प्रक्रियेसाठी त्यांनी वेळ काढूपणा केला होता. अखेर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर देखील संबंधित ठेकेदार रस्त्याच्या कामकाजात दिरंगाई करत आहे. या असंवेदनशील, घोटाळेबाज, स्थगिती, वसुली सरकारला जाग यावी, याकरिता रास्ता रोको केला. विकास कामामध्ये मुद्दाम आणण्यात येणारे अडथळे म्हणजे, हे सरकारच्या ढिसाळपणाचा उत्तम नमुना आहे".

या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे. यासाठी अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरुपात आश्वासन देण्याची मागणी केली आहे. तसेच या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असे आमदार तनपुरे यांनी म्हटले.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) शहराध्यक्ष संतोष आघाव, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे उपस्थित होते.

MLA Tanpure
Aaditya Thackeray : ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन क्षीरसागरांचा हिशेब चुकता केला; म्हणाले,'इथला एक गद्दार...'

आमदार तनपुरेंनी व्यक्त केली दिलगिरी -

रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे आहेत. त्यात रस्त्याचे काम दिरंगाईने होत आहे. यातून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना त्रास देण्याची इच्छा नव्हती. पण विकासकामांमध्ये मुद्दाम आणले जाणारे अडथळे आधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com