Aaditya Thackeray : ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन क्षीरसागरांचा हिशेब चुकता केला; म्हणाले,'इथला एक गद्दार...'

Kolhapur Shivsena UBT Rally : 'इकडे एक कॅरेक्टर आहे, घरात जाऊन मारामारी करतो....'
Aaditya Thackeray- Rajesh Kshirsagar
Aaditya Thackeray- Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेप्रकरणाचा फैसला उद्या लागणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे राजकारण याच मुद्द्यांभोवती फिरते आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटासह संपूर्ण राज्याचे या राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.पण या निकालाच्या आदल्यादिवशीच युवासेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीकेची तोफ डागली.

माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची मंगळवारी (ता.9)कोल्हापूर येथे जाहीर सभा झाली.या सभेत त्यांनी शिंदे फडणवीस- पवार सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आज महाराष्ट्राच्या मनात राग आहे. राज्यात सुवर्णकाळ दिसताना गद्दारी झाली आणि पाठीत खंजीर खुपसला गेला.महाराष्ट्राने तुमचं काय बिघडवलं? हळूहळू सर्व उद्योग गुजरातला पळवत आहे. 25 वर्षे एनडीएमध्ये होतो. पण कोणीही महाराष्ट्रवर अन्याय केला नाही.माझा महाराष्ट्र मागे जात आहे याची खंत खोके आमदारांना वाटतं नाही का? गेल्या दोन वर्षात किती नोकऱ्या राज्य सरकारने दिल्या.जे रोजगार होते तेही महाराष्ट्रातुन घालवला असल्याचा आरोप करत ठाकरेंनी खडेबोल सुनावले.

Aaditya Thackeray- Rajesh Kshirsagar
MLA Disqualification Case : मोठी बातमी! आमदार अपात्रतेचा निकालापूर्वीच ठाकरे गट नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात

क्षीरसागरांवर ह्ल्लाबोल...

आदित्य ठाकरेंनी या सभेत शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचा चांगलाच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नाही. सहसा मी गद्दारांवर बोलत नाही. इकडे एक कॅरेक्टर आहे, घरात जाऊन मारामारी करतो. इथला एक गद्दार घरात जाऊन मारतो.असले प्रकार महाराष्ट्रात चालतात कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी त्यांंनी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे? त्यांचे हात बांधले आहेत. असले प्रकार कोल्हापुरकर का खपवून घेतात. आगामी निवडणुकीत या गद्दाराला जागा दाखवा. पण सरकार बदलणार आहे, हा थोडा दिवसांचा खेळ आहे. इतकी मस्ती आली तर पाकिस्तानमध्ये घुसुन मारामारी करा.कोल्हापूर माझं आवडत शहर आहे. इथे कुस्ती खेळली जाते. मी ही कुस्ती खेळतो. माझ्यात जिगर आहे असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरे म्हणाले, आपले दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला पुन्हा आलो आहे.मागच्या वेळी आलो त्यावेळी अशीच गर्दी होती, असाच राग होता. आपल्या सभेला आणखी खुर्च्या लावल्या जात आहेत, नाहीतर अनेकांच्या सभेतून खुर्च्या गोळा कराव्या लागतात. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या जास्त आणि लोक कमी असतात. यांच्या स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी दोन हेलिपॅड आहेत, असा गरीब शेतकरी मुख्यमंत्री कुठं पाहिला नसेल असा टोलाही एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला.

'गुंतवणूक लोकांत करायची की या तिघांमध्ये...'

सरकार पाडलं पण त्यांनी काय मिळवलं ते सांगा.धोके...खोके घेऊन सरकारमध्ये गेला. पण आपलं राज्य कुठं जातंय याबद्दल काही वाटत नाही का? आपल्या राज्यातून किती उद्योग गेले आणि किती उद्योग आले, ते या सरकारने सांगितले पाहिजे.सरकार कसं चालवायचं हे यांना कळत नाही.तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यासारखं झालं. गुंतवणूक लोकांत करायची की या तिघांमध्ये करायची हे उद्योजकांना कळत नाही असा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला.

Aaditya Thackeray- Rajesh Kshirsagar
Hit and Run : आंदोलनाचा भडका उडणार? ; मध्यरात्रीपासून चालक 'स्टिअरिंग' सोडणार!

'पहले मंदिर फिर सरकार'

आदित्य ठाकरे म्हणाले,रवींद्र रायकर,रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर ईडीची कारवाई सुरू केली.जे स्वतः विकले गेले,ते आम्हांला काय शिकवणार? हृदयात राम आणि हाताला काम हे महत्त्वाचं आहे. ठाकरे यांनी 'पहले मंदिर फिर सरकार' ही घोषणा दिली. आम्ही अनेकवेळा त्याठिकाणी गेलो, इथून पुढे देखील जाणार आहे. तसेच 370 कलम हटवलं, त्यावेळी आम्ही देखील स्वागत केलं, आनंदोत्सव साजरा केला. पण आता महाराष्ट्रावर अन्याय करणारे कोणते कलम आणले आहे का? दिल्ली सरकार मुघलांसारखं आमच्या अंगावर येत आहे असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Aaditya Thackeray- Rajesh Kshirsagar
Dnyanraj Chougule : 'मी लोकसभेसाठी इच्छुक नाही हो!'; आमदार चौगुलेंनी स्पष्टच सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com