मी असो की पंकजा... गोपीनाथ गटातील सर्व जण बाजूला पडले : एकनाथ खडसे

Pankaja Munde | Gopinath Munde | Eknath Khadse : मंत्रिपदासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत...
Pankaja Munde Ekanath Khadse
Pankaja Munde Ekanath KhadseSarkarnama

जळगाव : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अपूर्ण आहे. पुढच्या काही काळात तो पूर्ण होईल. मात्र सध्याचा विचार केला तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) असोत की गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) परिवाराशी निगडित आणखी कोणी असो, या सगळ्यांवर सातत्याने अन्याय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. मंत्रिपदासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीवर त्यांना सल्ला दिला आहे.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची नाराजी, संजय राठोड यांना मिळालेले मंत्रिपद, जळगावमधील शिंदे गटातील ३ आमदारांना न मिळालेले मंत्रिपद अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर पुढे बोलताना खडसे म्हणाले, ओबीसी नेत्यांना डावलण्यात आल्याचे अनेक प्रकार नेहमीच घडले आहे. त्यातही जे कोणी गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे होते, मग त्यात मी आहे, पंकजा मुंडे आहेत, हे सर्व जण बाजूला पडले आहेत. मात्र पुढील काळात या सर्वांना न्याय मिळेल, असाही आशावाद खडसे यांनी व्यक्त केला.

Pankaja Munde Ekanath Khadse
Shinde Cabinet Expansion : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत : कदाचित माझी पात्रता नसेल...

काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपद न मिळाल्यावरुन जाहीर खंत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, आज रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळयांना माझ्या शुभेच्छा! राज्यात ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिला नसेल आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते देतील. माझं यावर काहीच म्हणणं नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

Pankaja Munde Ekanath Khadse
शपथविधीनंतर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमन; कार्यकर्त्यांनी अशी केली स्वागताची तयारी...

पंकजा मुंडे समर्थकांत संताप

पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि खासदार प्रितम मुंडे यांचे नाव आधी केंद्रीय मंत्रिपदाच्या यादीतून वगण्यात आले. त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे यांचा विधानपरिषदेच्या उमेदवार यादीत समावेश करण्यात आला नाही. आता त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतही घेण्यात आले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत नाराजी आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक सुमारे 50 पेक्षाही जास्त विधानसभा मतदार संघात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com