Video Hiraman Khoskar: मला त्रास दिल्यास मी गप्प बसणार नाही, 'क्रॉस व्होटिंग'चा आरोप असलेले काँग्रेसचे आमदार संतापले

Hiraman Khoskar on MLC Election Congress MLA Cross Voting Update: सहा फुटलेल्या आमदारांची काहीही चर्चा होत नाही. मात्र मी प्रामाणिकपणे आणि पक्षाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मतदान केल्यानंतरही माझ्यावर ठपका ठेवला जात आहे.
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Congress cross Voting: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. याबाबत पक्ष कठोर भूमिका घेणार आहे १९ जुलैला पक्षाचे निरीक्षक वेणूगोपाल मुंबईत दाखल होत आहेत.

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना देखील आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खोसकर देखील काहीसे आक्रमक झाले आहे. खोसकर काँग्रेसलाच 'हात' दाखविण्याच्या विचारात दिसतात. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते फुटली. यावरून आता आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत. याबाबत कारवाईची शक्यता असलेल्या आमदारांनी थेट पटोले यांना लक्ष्य केले आहे.

काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्याकडून आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. याबाबत संबंधित सात आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. यावेळी संबंधित आमदारांवर कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसची सातमध्ये फुटली आहेत.सातत्याने खोसकर यांच्याविषयी पक्ष नेत्यांकडून विधाने केली जात आहेत. माध्यमांतही केवळ खोसकर यांचीच चर्चा आहे. त्यामुळे खोसकर यांनी आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे कळविली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहेत. याच आठवड्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. निलंबन होताना त्यांची नावे समजतील, असा दावा विधान परिषदेची काँग्रेसचे प्रतोद आणि निवडणूक प्रतिनिधी अभिजित वंजारी यांनी केला आहे.

Hiraman Khoskar
Ashadhi Wari 2024: पंढरपुरात भाजपचे 'संकटमोचक' करताहेत गर्दीचे नियंत्रण

अन्य सहा फुटलेल्या आमदारांची काहीही चर्चा होत नाही. मात्र मी प्रामाणिकपणे आणि पक्षाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मतदान केल्यानंतरही माझ्यावर ठपका ठेवला जात आहे. मला त्रास दिल्यास किंवा कारवाई केल्यास मी गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार खोसकर यांनी मतदार संघातील आपल्या सहकाऱ्यांची व समर्थकांची संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यास गप्प न बसण्याचे त्यांचे धोरण आहे. अशी कारवाई झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करण्याचे अथवा अन्य मार्ग स्वीकारण्याचा पर्याय त्यांच्यापुढे असेल.

आमदार हिरामण खोसकर (Hiraman khoskar) यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. यावेळी त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच निशाणा साधला आहे. पटोले प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून विविध आमदार नाराज आहेत.

यातील काही आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे पटोले यांच्या कामकाजाविषयी नापसंती देखील व्यक्त केली आहे. आपण त्यांची नावे सांगणार नाही, मात्र कोणीही कोणताही दोष नसताना मला अडकवण्याचा प्रयत्न केल्यास मी शांत बसणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com