Pandharpur News : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी (Ashadhi Wari 2024) लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठल मंदिर ते महाद्वार या रस्त्यावर भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत, अशातच आज सकाळी ग्रामविकास मंत्री व आषाढी यात्रा समितीचे सदस्य गिरीश महाजन यांनी गर्दी नियंत्रणाचे काम केले.
भाजपचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज पंढरपुरात पोलिसांसोबत गर्दीचे नियंत्रण केले. महाद्वार चौकातील असलेल्या पोलिस टॉवरवर उभे राहून महाजन यांनी गर्दीचे नियंत्रण केले. महाजन यांनी पोलिसांना सूचनाही केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा प्रथमच आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे.गिरीश महाजन गेले तीन-चार दिवस वारीच्या नियोजनासाठी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. गिरीश महाजन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासोबत गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागेचे स्नान आणि विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी चंद्रभागेच्या काठावर मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेचा तीराला भक्तीचा 'महापुर' आला आहे. भगव्या पताकांनी चंद्रभागा भगवीमय झाली आहे. टाळ मृदुंगाचा गजराने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी तिरुपती बालाजी मंदीराच्या धर्तीवर पंढरपुरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी राज्य सरकारकडून 103 कोटी रुपयांचा निधी लवकरच दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केली. "राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, शेतकरी सुख समृद्धी होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठलचरणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.