सत्ताधारी भाजपला वाकुल्या दाखवत गॅस प्रकल्पाचे लोकार्पण?

इंडस्ट्रिअल, घरगुती जोडणीचे परस्पर उद्‌घाटन; केंद्र सरकारपर्यंत वाद जाणार
NMC Building
NMC BuildingSarkarnama

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) धडपड करीत असतानाच केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने (एमएनजीएल) भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला कानोसा लागू न देता परस्पर औद्योगिक व घरगुती गॅस (Gas Project) जोडणीचा प्रारंभ केला आहे.

NMC Building
...तर हजारेंच्या समोरच द्राक्ष उत्पादक शेतकरीही उपोषण करणार होते!

विकासकामांवरून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपसाठी हा एक मोठा दणका मानला जात असून, थेट ‘एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नेते दिल्लीपर्यंत बोलणार आहेत. पूर्ण होत असलेल्या विकासकामांचे उद्‌घाटन करता न आल्याने ‘एमएनजीएल’ने भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाकुल्या दाखविल्याने शाब्दिक शेरेबाजी सुरू आहे.

NMC Building
`ती`ने भाजपचे संख्याबळ, पोलिस दोघांना आव्हान दिले!

घरोघरी पाइपलाइनद्वारे तसेच औद्योगिक वसाहतीत लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा (एमएनजीएल) प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी शहरात जवळपास दीडशे किलोमीटरचे रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. नॅचरल गॅससाठी आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टँड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका येथे चार स्टेशन उभारले जाणार आहेत. विल्होळी नाका येथील गॅस फिलिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे घरगुती गॅस पाइपलाइनचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असताना, गॅसचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या घरगुती गॅसचे (पीएनजी) कनेक्शन अंबड-सातपूर लिंक रोडवरील डायमंड रेसिडेन्सीमधील फ्लॅटधारकाला देण्यात आले, तर मेसर्स नारखेडे स्वीच गिअर कंपनीला लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलपीजी) कनेक्शन देण्यात आले.

‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत व नाशिकचे संदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते जोडणीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही नेत्याला निमंत्रित न केल्याने सत्ताधारी भाजपला ‘एमएनजीएल’ने दणका दिल्याचे मानले जात आहे. रस्ते खोदाईचे काम शहरात सुरू आहे. त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्‍यक असते. ती परवानगी देताना भाजपने अडसर निर्माण केल्याचा ‘एमएनजीएल’चा आरोप आहे.

भाजपला दणका, श्रेय हुसकावले

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून विविध विकासकामांचा बार उडविण्याचे नियोजन आहे. त्यात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या घरगुती नॅचरल गॅस जोडणीच्या कामाचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीत केंद्र सरकारने दिलेल्या सर्व प्रकल्पांचे मार्केटिंग भाजपकडून केले जाणार आहे. असे असताना ‘एमएनजीएल’ने भाजपच्या तोंडचा घास पळविल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे थेट केंद्र सरकारपर्यंत तक्रारी केल्या जाणार आहेत, तर ‘एमएनजीएल’ला भविष्यात रस्ते खोदाईची परवानगी देताना महापालिकेकडून आडकाठी घातली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...

‘एमएनजीएल’मार्फत एक घरगुती व एक इंडस्ट्रिअल, अशा दोन जोडण्या ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. मात्र, त्या प्रायोगिक तत्त्वावर आहेत. उद्‌घाटनाचा स्वतंत्र कार्यक्रम होईल. -संदीप श्रीवास्तव, सीईओ, एमएनजीएल

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com