MNS Vs Nishikant Dubey: राज ठाकरेंना धमकावणाऱ्या भाजपच्या निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार; मनसेनं उचललं मोठं पाऊल

MNS News : राज्य सरकारनं तिहेरी भाषा धोरण स्वीकारले होते. त्याला राज्यातील मराठी जनतेनं तीव्र विरोध केला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आघाडीवर होते. पण यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानजनक विधान केले होते.
Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Raj Thackeray Vs Nishikant Dubey sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्य सरकारनं तिहेरी भाषा धोरण स्वीकारले होते. त्याला राज्यातील मराठी जनतेनं तीव्र विरोध केला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आघाडीवर होते. राज्यातील या घडामोडींचे पडसाद देशभर उमटले होते. त्यावर विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानजनक विधान केले होते. त्याचा सत्ताधारी भाजप वगळता सर्व राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध केला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. या मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला होता. त्याची धास्ती घेऊन राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी हा शासकीय आदेश रद्द करण्याची घोषणा केली होती.

मराठी माणूस कर्तृत्व शून्य आहे. तो आमच्या मेहेरबानी वर जगतो. आम्ही टॅक्स देतो त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस जगतो. मात्र मराठी माणूस हे सगळं विसरला असल्याने त्यांना धडा शिकवू. राज ठाकरे यांना पटक पटक के मारेंगे असे आक्षेपार्ह वक्तव्य दुबे यांनी केले होते.

या संदर्भात नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. दुबे यांना त्यांच्या पात्रतेची जाणीव करून देऊ. मराठी माणूस काय असतो हे त्यांना दाखवून देण्यासाठी कोणत्याही स्थितीत त्यांना न्यायालयात हजर राहावेच, नाशिकमध्ये आल्यावर मनसे स्टाईलने त्यांचा समाचार घेतला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक कोंबडे यांनी दिला आहे.

जुलैच्या प्रारंभी मराठी मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर अचानक तप्त झाला होता. यानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रस्थापित महायुतीच्या भाजपसह घटक पक्षाच्या नेत्यांनाही त्याचा हादरा बसला होता.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. याचदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना सातत्याने टार्गेट करताना पाहायला मिळालं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर आणि संसदेत महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेरल्यानंतरही पुन्हा निशिकांत दुबे यांनी मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान असल्याचे विधान केलं. याच त्यांच्या वक्त्व्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे चांगलंच झापलं आहे.

फडणवीस यांनी यावेळी इथली परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं ठणकावलं होतं. तसेच काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. इथले मराठी आणि अमराठी सुरक्षित आहेत. सगळे एकमेकांसोबत योग्यप्रकारे नांदत आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगत त्यांनी दुबेंसह ठाकरे बंधूंनाही टोला लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com