Raj Thackeray Politics : विधानसभा निवडणुकीबाबत मनसेचे 'राज' केव्हा स्पष्ट होणार?

Assembly Elections on MNS Own Strength? : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल का याबाबत वाढतोय गोंधळ.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढण्याचे संकेत आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात मात्र याबाबत पदाधिकाऱ्यांना काहीही संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे राज यांच्या राजकीय मौनाचा अर्थ शोधण्यात पदाधिकारी गुंतले आहेत.

राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ सामना आहे. तिसरा गडी म्हणून वंचित बहुजन आघाडी फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. अशा स्थितीत तिसरी शक्ती म्हणून राज ठाकरे यांची मनसे निवडणुकीत उतरणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

निवडणुकांबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) सातत्याने आपली राजकीय भूमिका बदलत आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला विरोध केला होता.

यंदाच्या निवडणुकीत सर्व विरोधक भाजप विरोधात संघटित होत होते. यावेळी अनपेक्षित पणे राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली.लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा नवी भूमिका जाहीर केली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray Nashik Tour : नाशिक दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे 'मनसे' पदाधिकाऱ्यांशी चर्चेविनाच परतले?

आगामी विधानसभा निवडणुकीत ते स्वबळाची तयारी करीत आहेत. अशा स्थितीत नाशिकच्या दौऱ्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीबाबत काय करायचे याविषयी नेमकी दिशा मिळेल असे वाटत होते.

ठाकरे यांनी आपल्या नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांची संघटना अथवा निवडणूक या विषयावर चर्चाही टाळली. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी कोणत्या मार्गाने जायचे याबाबत कार्यकर्त्यांचा गोंधळ आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने त्यात आणखी पाडण्याचेच काम झाले.

Raj Thackeray
Babanrao Gholap News : माजी मंत्री घोलपांचा मनसे अध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी मात्र...; नेमकं काय घडलं?

नाशिक (Nashik) जिल्ह्यात 15 तर शहरात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून मनसेचे दिलीप दातीर यांनी खूप आधीपासून तयारी केली आहे. अन्य तीन मतदार संघासाठी देखील आघाडी आणि युती यांच्याकडून संधी हुकलेल्यांना मनसे हा आधार वाटतो.

पक्षाचे अन्य पदाधिकारी उमेदवारीसाठी उत्सुक नसल्याने सध्या तरी मनसे विधानसभा निवडणुकीसाठी काय धोरण राबवते? याची मतदार आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com