Raj Thackeray Nashik Tour : नाशिक दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे 'मनसे' पदाधिकाऱ्यांशी चर्चेविनाच परतले?

Raj Thackeray at Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जाऊन राज ठाकरे यांनी पूजा केली, संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीत सहभागीही झाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray and MNS Nashik News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर होते. या सबंध दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे यांच्याशी चर्चेसाठी ताटकळत होते. मात्र कोणाशीही संवाद न करता ठाकरे यांनी तडक मुंबई गाठली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे बुधवारी नाशिकला मुक्कामी होते त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. गुरुवारी सकाळी ते त्र्यंबकेश्वरला गेले यादरम्यान अतुल चांडक यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी देखील पदाधिकारी भेटीसाठी प्रवेशद्वारावरच थांबले होते. मात्र या पदाधिकाऱ्यांचं राज ठाकरेंशी बोलणं झालं नसल्याचं सांगितलं गेलं आहे.

त्यानंतर त्र्यंबकेश्वरला मार्गस्थ होताना रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. हे स्वागत स्वीकारतच ते त्र्यंबकेश्वरला पोहोचले.

त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरात राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी दर्शन घेतले. यावेळी वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी रवाना होताना, या दिंडीत काही वेळ ते सहभागी झाले.

Raj Thackeray
Babanrao Gholap News : माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार संजय पवार शिवसेनेमध्ये दाखल!

त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्र्यंबकेश्वर मंदिराविषयीच्या इतिहासाची माहिती त्यांना विश्वस्तांनी दिली. या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्या पाठीत चमक भरली. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रमही आवरता घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray
MNS Reply to Uddhav Thackeray : 'हिरव्या मतांमुळे काही जागा जिंकणाऱ्यांना..' ; उद्धव ठाकरेंवर 'मनसे'चा पलटवार!

यावेळी राज ठाकरे यांच्या समवेत संकेत देशपांडे आणि काका पाटील होते. त्यांच्या या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक, सुजाता डेरे, अंकुश पवार, रतन कुमार इचम, सुदाम कोंबडे, सलीम शेख, मनोज घोडके, सचिन सिन्हा, नामदेव पाटील, वैभव महिरे यांचे विविध पदाधिकारी सहभागी होते.

मात्र हे सर्व पदाधिकारी आणि राज ठाकरे यांचा संवाद झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे आले आणि देवदर्शन करून मुंबईला निघून गेले, असेच त्यांचा या दौऱ्याचे चित्र पाहायला मिळाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com