Samruddhi Toll booth attacked : सामान्यांना छळणारे, अरेरावी करणारे टोल नाका प्रशासन राजकीय नेत्यांपुढे कसे शरण जाते याचे उदाहरण येथे घडले. टोलसाठी `मनसे`चे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने त्यांच्या समर्थकांनी आज पहाचे समृद्धी महामार्गाचा गोंदे (सिन्नर) टोल नाक्याची तोडफोड केली. (Police waiting since morning but no one came forward for lodge a complain)
मनसेचे नेते अमित ठाकरे हे पहाटे शिर्डीहून नाशिकला येत असताना ते समृद्धी महामार्गाने आले. गोंदे टोलनाका येथे त्यांची वाहने टोल साठी थांबविण्यात आली. अर्धा तास प्रतिक्षा करावी लागली. टोल शिवाय त्यांना सोडले नाही. त्याचा राग आल्याने नाशिक शहरातील कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केली.
समृद्धी महामार्ग हा आपला प्रकल्प असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. त्यांच्या या प्रकल्पावर पहिला हल्ला आज झाला. `मनसे`च्या कार्यकर्त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोल नाका फोडला, असे म्हणता येईल. पहाटे तीनला पक्षाच्या जिंदाबादच्या घोषणा देत दहा ते १५ मिनीटे ही तोडफोडस सुरू होती. ती सर्व `सीसीटीव्ही` कॅमेऱ्यात कैद झाली. कार्यकर्त्यांनी देखील मोबाईलवर त्याचे चित्रीकरण केले. पोलीस मात्र तक्रारीची वाट पाहत बसल्याने नागरिकांत पोलीसांची ही तत्परता चर्चेचा विषय ठरली.
याबाबत `मनसे`च्या पादधिकाऱ्यांनी सांगतिले की, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांची अरेरावी आणि गैरवर्तनाने पदाधिकाऱ्यांना संताप आला. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी खळ्ळ-खट्याक करावे लागले.
यावेळी नाशिकचे शहर अध्यक्ष दिलीप दातीर, विध्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, शशी चौधरी, बाजीराव मते, शहर संघटक ललित वाघ, निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, शैलेश शेलार आदी उपस्थित होते, असे `मनसे`च्या पत्रकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.