Aditya Thackeray : आदित्य म्हणाले, चाळीस आमदारांचे चेहरे आता काळवंडले आहेत!

Now those fourty MLA`s face became dull-ठाकरेंनी उच्चारला `शोले`चा संवाद, `अब तुम्हारा क्या होगा, किधर जाओगे`
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray On Rebel : मी मुद्दामहून पावसाळी अधिवेशनाला विधीमंडळात गेलो होतो. त्या चाळीस बंडखोराचे चेहरे पाहिले. त्या सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसले. काळे पडले होते, असा टोमणा आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना लगावला. (Those fourty MLA loose there confidence after NCP Split)

Funds

शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिकचा (Nashik) दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा सातपूर येथे घेतला. यावेळी मणीपूरच्या व्हिडीओ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खडसावले.

Aditya Thackeray
Funds Politics : आमदारांचा `तो` आनंद किती काळ टिकेल?

श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील जनतेपुढे अनेक समस्या आहेत. मंत्री म्हणून हे लोक कधी लोकांचे दुःख ऐकायला जाणार आहेत की नाही?.

माणिपूरचा तो वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे बदनामी झाली असे इथले मुख्यमंत्री सांगत आहेत. आता ते आंदोलन देखील करणार आहेत. खरे तर तो व्हिडीओ पाहिल्यावर या सरकारची देशभक्ती कुठे गेली? असा प्रश्न पडतो.

Aditya Thackeray
BJP News : भाजपच्या आमदार आहेर, ढिकलेंनी पालकमंत्र्यांनाही मागे टाकले!

श्री. ठाकरे यांनी या विषयावर बोलताना संतप्त प्रतिक्रीया देत सांगितले की, त्यांना लाज काशी वाटत नाही?, महिलांच्या बाबत काय घडलं हे त्यांना महत्त्वाचे नाही तर राज्याची बदनामी झाली असे ते सांगत आहेत. तो व्हिडीओ ७५ दिवसांच्या आधीचा आहे. व्हिडीओ बाहेर आला म्हणून त्यांना राग येतो. मात्र त्यातील तीन महिलांमधील एक महिला जवानाची पत्नी होती. आता तुमची देशभक्ती कुठे गेली?

Aditya Thackeray
Ajit Pawar News : मानलं अजितदादांना ! एका झटक्यात राष्ट्रवादी-शिंदेंच्या आमदारांना २५-२५ कोटी वाटले...

ते पुढे म्हणाले, देशातील विरोधी पक्ष देश वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. देशात वातावरण सरकार विरोधात आहे. भविष्यात स्वाभिमानाची आणि प्रमाणिकपणाची लढाई आहे. देशात हिटलर शाही येत असल्याची टिका देखील त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com