MNS Protest : मराठी पाट्यांसाठी दिलेली मुदत संपली; खळ्ळखट्याक अगोदर मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम

Ahmednagar MNS Protest News : मराठीच्या मुद्द्यावरून नगरमध्ये मनसे आक्रमक झाली आहे...
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News : मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही आणि आक्रमक राहिलेली आहे. या मुद्द्यावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सूचक आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अनेक वेळेस खळ्ळ खट्याक आंदोलने केलेली आहेत. विविध दुकाने, अस्थापनांवर मोठ्या अक्षरात मराठी शब्दांमध्ये पाट्या असाव्यात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत एक महिन्याची मुदत दिली होती.

मुदतीनंतरही अनेक अस्थापनांनी आपल्या दुकानांवरील पाट्या मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमध्येच ठेवल्याचे समोर येत असल्याने मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नगरमध्ये यामुद्यावर मनसेच्या वतीने खळ्ळ खट्याक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagar News
Nagar Political News : भांगरेंची लहामटेंवर सडकून टीका ; अकोल्याचे राजकारण तापणार..

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अस्थापने, दुकाने यांना इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. याबाबत मनसेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त, कामगार आयुक्त यांनी अस्थापनांना पाट्या मराठीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती.

परंतु, आठ दिवसांची मुदत संपली आहे. अनेक आस्थापने, दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत. जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी पुढील दोन दिवसांत या पाट्या मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा गजेंद्र राशिनकर यांनी यावेळी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्या मराठीत करण्यात याव्यात याबाबतचे आल्टिमेटम स्वरूपातील निवेदन मनसेच्यावतीने तोफखाना पोलिस स्टेशनला दिले आहे. यावेळी मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, संकेत व्यवहारे आदि उपस्थित होते.

(edited by sachin fulpagare)

Ahmednagar News
Nagar News : गारपीटग्रस्त गावांचा निवडणुकांवर बहिष्कार ? शेतकरी उतरले रस्त्यावर..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com