पाण्यासाठी झुंजणाऱ्या मोडाळे गावाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

२४ एप्रिलला पंतप्रधानांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
Modale Grampanchayat Bilding
Modale Grampanchayat BildingSarkarnama
Published on
Updated on

इगतपुरी : देशपातळीवर (National Award) दिला जाणारा मानाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार इगतपुरी तालुक्यातील मोडाळे (Modale) ग्रामपंचायतीला (Village) जाहीर झाला आहे. येत्या २४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीर येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. मोडाळे गावाने केलेल्या शाश्वत विकासाची ही पोचपावती असल्याने कौतुक होत आहे.

Modale Grampanchayat Bilding
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडूनही ‘जय श्रीराम’चा घोष

पुरस्कारासाठी राज्यांतून १४ निवडक ग्रामपंचायतीपैकी मोडाळे गावाची निवड झाली. गावाचा सर्वांगिण विकास, स्वच्छता नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई.गव्हर्नरन्स आदी क्षेत्रात ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात. विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून आता गावाला निधी मिळणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी कौतुक केले.

Modale Grampanchayat Bilding
भारती पवार म्हणाल्या, होमिओपॅथी डॉक्टरांच्या पाठीशी!

अनेक वर्षांपासून या पुरस्कारासाठी आम्ही गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. या पुरस्काराच्या माध्यमातून उर्वरित विकासकामे पूर्ण करून गावाचे नंदनवन बनवू, असे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले.

मोडाळे गावाची प्रेरणादायी वाटचाल

ग्रामविकासाचा ध्यास घेऊन अभूतपूर्व विकास, विविध योजना आणि निसर्गसंपन्न मोडाळे गावाची निर्मिती झाली आहे. सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनीही गावाला विकसित करण्यात हातभार लावलेला आहे. यापूर्वीही मोडाळे गावाला स्मार्ट गावाचा पुरस्कार मिळाला असून केंद्राच्या योजनेत सहभागी होण्यासाठी स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. या निकषात मोडाळे ग्रामपंचायत पात्र ठरली असून पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकर पुरस्काराच्या माध्यमातुन थेट पंतप्रधानांकडून पुरस्कार मिळणार आहे. गावाने लाखो रुपयांचा विविध योजना परिणामकारकपणे राबवून त्यांनी गावाला राज्याच्या आणि आता देशाच्या नकाशावर आणले आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com