Modi Sarkar and Onion Issue : केंद्र सरकारला गुजरातनंतर आता कर्नाटकचा पुळका; कांद्याबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Onion Farmers of Maharashtra : प्रारंभी गुजरातहून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली. आता कर्नाटकच्या कांद्याचे निर्यात शुल्क घटविण्यात आले. मात्र...
Onion
Onion sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा प्रश्न भेडसावत होता. विरोधकांनी तो प्रचाराचा मुद्दा केला होता. शेतकरी या प्रश्नावर संतप्त होते. केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने कांद्याबाबत नवा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार कर्नाटकातील बेंगलोर रोझ या कांद्याच्या निर्यातीला निर्यात शुल्कातून वगळण्यात आले आहे. या कांद्याची निर्यात करताना केंद्र शासनाने 40 टक्के निर्यात शुल्क निश्चित केले होते. हे शुल्क हटवावे यासाठी स्थानिक कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Onion
Dindori constituency 2024 : भाजपच्या कांदा निर्यात बंदीने शेतकरी कंगाल, पाकिस्तान मालामाल !

केंद्र शासनाने सात डिसेंबरला महाराष्ट्रातील कांद्या निर्यातीवर (Onion Exports) 40 टक्के निर्यात शुल्क आकारले होते. त्यानंतर कांद्याचे दर काही प्रमाणात कोसळले हे दर आणखी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने त्यात पुन्हा हस्तक्षेप केला. त्यानुसार निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला या निर्यात बंदीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कणाच मोडला.

केंद्र शासनाने निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच निर्यात बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पक्षाचे अन्न व नागरी पुरवठा आणि वितरण विभागाचे मंत्री पियुष गोयल यांच्या विभागाने हा निर्णय घेतला होता.

मात्र हा निर्णय घेताना 40 टक्के निर्यात शुल्क कायम ठेवले होते. हे निर्यात शुल्क मागे घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे न झाल्याने कांदा व्यापाऱ्यांना मोठी झळ सोसावी लागली. त्याआधी कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता.

Onion
Dada Bhuse Politics : दादा भुसे यांना मित्राचे आव्हान; विधानसभेच्या वाटेत नवा अडथळा...

केंद्रातील मोदी सरकारकडून(PM Modi) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादकांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. गेले काही दिवस या संदर्भात भारतीय जनता पक्षाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येत होती.

गुजरातच्या कंपनीला निर्यातीची परवानगी दिली होती. मात्र जेथून कांदा घेतला जात होता, त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत होती. प्रारंभी गुजरातहून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली. आता कर्नाटकच्या कांद्याचे निर्यात शुल्क घटविण्यात आले. मात्र अद्यापही महाराष्ट्राती शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर झालेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com