Nashik Political News : मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या राजकारणात काल एक नवीन ट्विस्ट आला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे एकेकाळचे घनिष्ठ मित्र असलेल्या बंडूकाका बच्छाव (Bandukaka Bachchao) यांनी अप्रत्यक्षरीत्या भुसे यांच्या विरोधात आपली उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे मालेगाव बाह्यचा राजकारणाला नवे वळण मिळणार आहे. घरातूनच आव्हान मिळाल्याने दादा भुसे यांच्या विधानसभेच्या वाटेत नवा अडथळा निर्माण होणार आहे.
नाशिकमधील (Nashik) मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर बारा बलुतेदार मित्र मंडळाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी मालेगाव बाह्य मतदार संघाला एक अतिशय प्रामाणिक आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेला उमेदवार मिळाल्याचे सांगितले.
या उमेदवाराने कोणाकडूनही खोके घेतलेले नाही. कोणाशीही गद्दारी केलेली नाही. हा प्रामाणिक आणि खुद्दार माणूस आहे, असे सांगत अप्रत्यक्षरीत्या मंत्री भुसे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "समाजाच्या प्रत्येक घटकाशी तो संपर्कात आहे. अशा कार्यकर्त्याला या मतदारसंघातून निश्चितच आमदार होता येईल. त्यासाठी आज बंडूकाका बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे". वसंत गीते यांनी म्हणताच उपस्थितांनी प्रतिसाद देत बच्छाव यांचा नावाने घोषणा दिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बंडूकाका बच्छाव (Bandukaka Bachchao) आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व समाजाच्या आणि धर्माच्या लोकांसाठी उपक्रम राबवित असतात. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. बुधवारी त्यांनी डोंगराळे येथे जैतोबा मंदिराच्या भाविकांसाठी दोन निवारा शेड बांधून दिल्या.
त्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर मसगाव महाविद्यालयाच्या मैदानावर झालेला कार्यक्रमात त्यांचे शक्ती प्रदर्शन होते. त्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे दादा भुसे (Dada Bhuse) समर्थकांना एक संदेश गेला आहे.
मालेगाव बाह्य मतदार संघात भुसे यांच्या विरोधात गत निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव आणून त्यांना निष्क्रिय करण्यात आले, अशी चर्चा आहे. सध्या भुसे यांचे विरोधक, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या मागे सरकारी यंत्रणाचा उपयोग करून विविध खटल्यांचा ससेमिरा लावण्यात आला आहे.
ते सध्या अटकेत आहेत. त्यामुळे भुसे यांनी विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयोग चालवल्याची चर्चा आहे. आता मात्र, बंडूकाका बच्छाव एकेकाळी मंत्री भुसे यांचे मित्र होते, आता त्यांनीच भुसे यांना आव्हान दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.